वयोवृद्ध लोक सांगून गेले की, संशयाला काहीच औषध नाही. संशयाने चांगलं सुरू असलेलं नातं तुटू शकतं. संशयामुळे असंच एका कपलचं नातं धोक्यात आलं होतं. मॅन्चेस्टरमध्ये एका महिलेने तिच्या बॉयफ्रेन्डच्या उशीखाली एक फोटो पाहिला. हा फोटो एका मुलीचा होता. महिलेला वाटलं की, फोटोत तिच्या बॉयफ्रेन्डची एक्स-गर्लफ्रेन्ड आहे. महिलेने एक लांबलचक पोस्ट लिहून बॉयफ्रेन्डसोबत ब्रेकअप केलं. नंतर तिला समजलं की, ज्या फोटोला ती बॉयफ्रेन्डची एक्स समजत होती, ती मॅट्रेसवरील एक मॉडेल आहे.
ट्विटरवर स्वत: शेअर केला किस्सा
महिलेचं नाव जोई आहे आणि तिने स्वत: तिच्यासोबतची घटना ट्विटरवर शेअर केली आहे. जोई म्हणाली की, तिने जे केलं त्यांचा तिला पश्चातापही आहे आणि तिला हसूही येत आहे. जोईचा हा किस्सा आता सोशल मीडियात व्हायरल झालाय. जोईचे ट्विट्स वाचून यूजर्स इमोशनल होत आहेत.
जोईने लिहिले की, 'मला आठवतं की, मी माझ्या बॉयफ्रेन्डच्या उशीखाली त्याच्या एक्स-गर्लफ्रेन्डचा फोटो पाहिला. मी त्याला एक लांबलचक मेसेज लिहिला आणि ब्रेकअप केलं. पण नंतर कळालं की, त्या फोटोतील मुलगी त्याची एक्स नाही तर एक मेट्रेसवरील एक मॉडल आहे'. जोईने त्या मेट्रेसचा फोटोही शेअर केला आहे.
त्यानंतर तिने लिहिले की, 'मी मेसेजमध्ये लिहिलं होतं की, गोष्टी वेगाने बदलत आहेत आणि मला समजत नाहीये की, हे सगळं कसं होईल. जर तुला वेळ हवा असेल तर घे...' जोईने असंही सांगितलं की, मेसेज पाठवल्यानंतर ती खूप रडली. पण काही वेळाने जेव्हा तिने फोन चेक केला तर तिच्या बॉयफ्रेन्डने एक फोटो पाठवला होता. तेव्हा तिला जाणीव झाली की, तिने जे पाहिलं तो मेट्रेसवरील लेबल होतं.
नंतरच्या ट्विटमध्ये तिने लिहिले की, 'तो फोटो पाहून मी माझ्याच नजरेत लहान झाले होते. मला असं वाटत होतं की, जमीन फाटावी आणि मी आकाशात सामावून जावं. तो मूर्खपणा होता'. जोईने बॉयफ्रेन्डचा मेसेजला रिप्लाय केला नाही. पण काही वेळाने तिचा बॉयफ्रेन्ड तिच्या दरवाज्यासमोर उभा होता आणि जोरजोरात हसू लागला होता.