फोनचा वापर वेगवेगळ्या कामांसाठी केला जातो. अनेकजण फोनमध्ये काही गोष्टींच्या नोंदी ठेवतात. यात काही खाजगी गोष्टींचाही समावेश असतो. जर या गोष्टी दुसऱ्या कुणी वाचल्या तर ते हैराण होतात. एका पत्नीसोबतही असंच झालं. पतीचा फोन तिच्या हाती लागला आणि तिने त्याच्या पर्सनल नोट वाचल्या. त्यात अशा गोष्टी लिहिल्या होत्या ज्या वाचून पत्नीला धक्का बसला. त्या गोष्टी ती आता विसरूही शकत नाहीये.
सोशल मीडिया प्लेटफॉर्म रेडिटवर है r/relationship_advice. नावाचा एक ग्रुप आहे. ज्यावर लोक रिलेशनशिपबाबत सल्ले मागत असतात. नुकताच एका महिलेने लोकांना सल्ला मागितला. कारण तिला पतीच्या फोन तिच्याबाबत लिहिलेल्या काही गोष्टी समजल्या होत्या. ज्याचा तिने विचारही केला नव्हता. ३२ वर्षीय महिलेने सांगितलं की, तिचा पती थेरपीसाठी जातो आणि कारण तो संवेदनशील मुद्द्यांवर मोकळेपणाने बोलू शकत नाही. पती थेरपीला जाऊन परिवारासंबंधी आणि इतर गोष्टींवर बोलतो.
How do I (32F) recover after seeing a note about how ugly and fat I am in my husband’s (34M) phone? byu/throwra_sawhisnote inrelationship_advice
अलिकडेच तिला पतीच्या फोनमधील काही फोटो बघायचे होते. यासाठी त्याला न विचारता तिने त्याचा फोन घेतला. फोनमध्ये अचानक तिला एक नोट दिसली, ज्यात पतीने तिच्याबाबत काही गोष्टी लिहिल्या होत्या. त्यात लिहिलं होतं की, "बाळ झाल्याच्या २ वर्षानंतरही पत्नीचं वजन कमी होत नाही, ती जाड झाली आहे. तिचा चेहरा सुंदर आहे पण ती मेकअप करत नाही आणि तिला डबल चिनही आहे".
या गोष्टी वाचून पत्नीला धक्का बसला. तिला माहीत नव्हतं की, तिचा पती तिच्याबाबत असा विचार करतो. महिलेच्या लक्षात आलं की, पतीने हे सगळं थेरपी सेशनमध्ये चर्चा करण्यासाठी लिहिलं असेल. महिलेने लोकांना विचारलं की, या स्थितीत तिने काय करावं. लोकांनी तिला सल्ला दिला की, तिने पतीसोबत याबाबत मोकळेपणाने बोलावं आणि त्याच्या भावना समजून घेऊन तिच्या मनातील गोष्टीही सांगितल्या पाहिजे.