दोन वर्ष कोरोनामुळे सर्वांचे मोठे नुकसान झाले हे खरे असले तरी कोरोनाने आपल्याला बरंच काही शिकवलं सुद्धा आहे. निरोगी राहण्यासाठी कसा आहार घ्यावा तसेच कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजे हे आपल्याला समजले. तरी अजून काही लोकांना अक्कल आलेली नाही. एका महिलेने असे काही केले आहे की थेट पोलिसांना तिच्यावर कारवाई करावी लागली. वटवाघुळाचे सूप bat soup पितानाचा महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. व्हिडिओ दिसताच पोलिसांनी तिला अटक केली आहे.
Thailand ही घटना घडली आहे थायलंडमध्ये.थायलंडच्या एका शहरात एका महिला शिक्षिकेने ९ नोव्हेंबरला वटवाघुळाचे सूप पितानाचा व्हिडिओ अपलोड केला. या व्हिडिओतून ती इतरांनाही सूप पिण्यास प्रोत्साहित करताना दिसत आहे. हा व्हिडीओ तिने तिच्या युट्युब चॅनलवर पोस्ट केला आहे. यात ती स्पष्ट वटवाघूळ पकडून खाताना दिसत आहे.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोक भडकले. अनेकांनी कमेंटमध्ये पोलिसांना टॅग केले. अशाच कारणांमुळे जगभरात कोरोना पसरला. पुन्हा तीच चुक होत आहे. पोलिसांनी हा व्हिडिओ बघितल्यानंतर महिलेला ताब्यात घेतले. तिला ५ वर्षांची शिक्षा किंवा ११ लाख दंड भरावा लागणार आहे.