कोरोनाकाळात अनेकांनी आपल्या जवळच्या माणसांना गमावलं आहे. सध्या कोरोना लाटेत फक्त वृद्धच नाही तर तरूणांनाही आपला जीव गमवावा लागत आहे. कुठे ऑक्सिजन सिलेंडरची कमतरता, कुठे बेड्स उपलब्ध नाही तर कुठे इजेक्शन्ससाठी मारामार यामुळे माणूस सगळ्यांनी बाजूंनी अडकल्यासारखा वाटत आहे. कोरोनानं भरपूर लोकांचे प्राण घेतले. अशातच एक मन हेलावून टाकणारा फोटो समोर आला आहे. ७५ वर्षीय आजींनी कोरोनातून बरं झाल्यानंतर डॉक्टरांना मिठी मारली आहे.
या फोटोत तुम्ही पाहू शकता एका वयस्कर महिलेनं डॉक्टरांना मिठी मारली आहे. ट्विटरवर समोर आलेल्या माहितीनुसार डॉक्टरांचे नाव डॉ. अभिशिक्ता मुळीक आहे. पीपीई कीट घातलेल्य या डॉक्टरचा आणि वृद्ध महिलेचा फोटो पाहून ही महिला किती एकटी पडली असावी हे दिसून येतं. इंडिया टाइम्सनं दिलेल्या माहितीनुसार कोलकात्यातील रुग्णालयातून हा फोटो समोर आला आहे.
हा फोटो पाहून लोक भावूक झाले आहेत. अनेकांना लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव या पोस्टवर केला आहे. एका युजरनं डॉक्टरर्स आपल्याला सुरक्षा देण्यासाठी आहेत. तसंच आपल्याला देव नाही तर डॉक्टर वाचवत आहेत, असं म्हटलं आहे. कोरोनाकाळात ज्या लोकांचे नाव सोनेरी अक्षरात लिहिले जाईल ते कोरोना वॉरिअर्स असतील.
समोर आला पीपीई कीट काढल्यानंतरचा डॉक्टरचा फोटो
काही दिवसांपूर्वी पीपीई कीट घातलेल्या एका डॉक्टरचा फोटो व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये पीपीई कीट काढल्यानंतर या डॉक्टरांना किती घाम आला आहे, हे तुम्ही पाहू शकता. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं होतं की, मी देशासाठी काम करतो याचा मला गर्व आहे. हा फोटो इंटरनेटवर चांगलाच व्हायरल झाला आहे. या फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता डाव्या बाजूच्या फोटोत डॉक्टरांनी पीपीई कीट घातला आहे तर उजव्या बाजूच्या फोटोत पीपीई किट काढल्यामुळे या डॉक्टरांचे संपूर्ण शरीर घामाने भिजले आहे. नशीब चमकलं ना राव! पहिल्यांदाच तिकीट विकत घेतलं; १०० रूपयांच्या लॉटरीनं मजूराला करोडपती बनवलं
त्यांनी हा फोटो ट्विट करताना कॅप्शन दिलं की, 'मी सगळे डॉक्टरर्स आणि आरोग्य कर्मचारी यांच्याकडून सांगू इच्छितो की, ''आम्ही आमच्या कुटुंबियांपासून खूप लांब आहोत. कधी कधी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या १ पाऊल जवळ राहून उपचार करावे लागतात. अशा स्थितीत सगळ्यांनी लस घ्यायलाच हवी असं मी आवाहन करतो. आता फक्त हेच समाधान आहे, सुरक्षित राहा.'' नशीब चमकलं ना राव! पहिल्यांदाच तिकीट विकत घेतलं; १०० रूपयांच्या लॉटरीनं मजूराला करोडपती बनवलं