आपण जगात सर्वात सुंदर आणि आकर्षक दिसावं असं प्रत्येकाला वाटत असतं. यासाठी बड्या घरची मंडळी कोट्यवधी खर्च देखील करतात आणि विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया करुन घेतात. पण यात मोजक्यांनाच यश मिळतं. तर बहुतांश लोकांना याच्या उलट परिणामांना सामोरं जावं लागतं. अमेरिकेतील एका लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लूएन्सरसोबत देखील असाच किस्सा घडला आहे. युट्यूबर डेनी बँक्स (Danii Banks) हिनं परफेक्ट फिगरसाठीच्या इंजेक्शन्सवर ७ लाखांचा खर्च केला. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही.
२१ वर्षीय डेनी बँक्स हिनं स्वत: याबाबतचा खुलासा केला आहे. २०१४ साली डेनीनं मियामीमध्ये हायड्रोजेल बट इंजेक्शन घेतलं होतं. त्यानंतर याच पद्धतीची आणखी तीन इंजेक्शन घेतली. त्यावर जवळपास ७.४ लाखांचा खर्च डेनीनं केला. पण ज्यासाठी तिनं इंजेक्शन्स घेतली होती त्याचा अपेक्षित परिणाम काही तिला पाहायला मिळाला नाही. एका शो दरम्यान डेनीनं धक्कादायक खुलासे केले. कॉस्मेटिक सर्जरी खूप धोकादायक ठरली असं तिनं सांगितंल. शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार शरिराच्या ठेवणीत बदल करण्यासाठी ज्या प्रक्रियेचा वापर केला गेला ती अतिशय चुकीच्या पद्धतीची होती. इतकंच नव्हे, तर सर्जरीसाठी वापण्यात आलेल्या वस्तूंवरही डॉक्टरांनी सवाल उपस्थित केले.
डेनीचे ६० लाख फॉलोअर्ससर्जरी केल्यानंतर डेनीच्या फिगरमध्ये चुकीच्या पद्धतीनं बदल होत आहेत. पण त्यासोबत आता कोणताही वेगळा प्रयोग करू नये असा सल्ला तिला देण्यात आला आहे. जे जसं घडतंय तसं त्याला सामोरं जावं असं डेनीला सांगण्यात आलं आहे. आता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच निर्णय घेत असल्याचं डेनीनं सांगितलं. इन्स्टाग्रामवर डेनी बँक्स हिचे ६० लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत.