आजकाल अनेकदा आपण कोणत्या ना कोणत्या कामात व्यस्त असलो किंवा काही विशेष असेल तर बाहेरुन ऑनलाईन पर्यायांचा वापर करून जेवण मागवतो. दरम्यान, एका तरूणीनं व्यस्त असल्यामुळे Online Food Delivery ऑनलाईन फुड डिलिव्हरी अॅप झोमॅटोवरून जेवण ऑर्डर केलं Zomato होतं. परंतु, तिच्यासोबत जे झालं ते जाणून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. ऑर्डर केलेलं जेवण तरूणीपर्यंत पोहोचवण्यासाठी फूड डिलिव्हरी बॉयला उशीर झाला. यानंतर त्या तरूणीनं ती ऑर्डर कॅन्सल केली. त्यानंतरही थोड्या वेळानं तो डिलिव्हरी बॉय जेवण घेऊन त्या तरूणीच्या घरी पोहोचला. परंतु तरूणीनं ते जेवण घेण्यास नकार दिला तेव्हा त्या डिलिव्हरी बॉयला राग अनावर झाला आणि त्यानं त्या तरूणीच्या नाकावर बुक्का मारला. त्यानंतर तिच्या नाकातून रक्तही वाहू लागलं. त्यानंतर या तिनं याचा व्हिडीओ बनवून लोकांना याबाबत माहिती दिली. हा व्हिडीओही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये त्या तरूणीनं आपल्यासोबत घडलेल्या घटनेचं वर्णनही केलं आहे. आपण केलेली ऑर्डर येण्यास उशीर झाल्यामुळे कंपनीच्या कस्टमर केअरला माहिती देऊन तिनं ऑर्डर कॅन्सल केली होती. ज्यावेळी ती महिला कस्टमर केअरसोबत बोलत होती त्याचवेळी डिलिव्हरी बॉय जेवण घेऊन त्या ठिकाणी पोहोचला. आपण अर्धाच दरवाजा उघडला आणि जेवण घेण्यास नकार दिला. त्यावेळी डिलिव्हरी बॉयनं आपल्यासोबत वाद धावण्यास सुरूवात केली. परंतु त्यानंतर त्यानं घरात शिरून जेवण ठेवलं. ज्यावेळी त्याचा आपण विरोध केला तेव्हा त्यानं तुमचा नोकर आहे का असं विचारत आपल्या नाकावर बुक्का मारल्याचं तरूणीनं सांगितलं.
रुग्णालयात जाऊन उपचारया प्रकारानंतर कोणीही आपली मदत केली नाही. तसंच यानंतर आपण रुग्णालयात जाऊन उपचार घेतलं. सध्या बोलण्यासारखीही आपली स्थिती नाही. बंगळुरू पोलिसांनी आपली मदत केली असून लवकरच त्या व्यक्तीला अटक करण्याचं आश्वासन दिल्याचं तरूणीनं व्हिडीओमध्ये सांगितलं. झोमॅटोकडून माफीतरूणीच्या आरोपांवर झोमॅटोकडूनही स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. तसंच कंपनीनं महिलेची माफीदेखील मागितली आहे. दरम्यान, स्थानिक अधिकारी त्यांच्याशी संपर्क साधणार असून पोलीस तपास किंवा अन्य वैद्यकीय सुविधा ते उपलब्ध करून देणार आहेत. इतकंच नाही तर कंपनीनं तरुणीला संबंधित व्यक्तीवर कारवाईचं आश्वासनही दिलं आहे.