शाळेत असो वा घरी अनेकजण कारणे देण्यात पटाईत असतात. आधी शाळेतून घरी जाण्यासाठी अनेकांना एकापेक्षा कारणे सांगितली असतील आणि आता लोक ऑफिसमध्येही सुट्टी घेण्यासाठी वेगवेगळी कारणे सांगतात. कधी कुणी सांगतं पोट दुखतंय, कधी कुणी सांगतंय डोकं दुखतंय. पण एका महिलेने सुट्टीसाठी तिच्या बॉसला एक फोटो पाठवला. तिने सांगितले की, तिच्या गाडीचा टायर पंक्चर झालाय. इतकेच काय तिने पुरावा म्हणून फोटोही पाठवला. पण हा फोटो फेक होता. बस मग काय...तिचं खोटं सगळ्या जगाला माहिती पडलं.
Syd the kid नावाच्या ट्विटर यूजरने एक ट्विट केलं आहे. त्याने लिहिलंय की, त्याच्या एका महिला सहकाऱ्याच्या गाडीचा टायर पंक्चर झालाय. झूम करून बघा तुम्हाला कळेलच.
झूम केल्यावर हे स्पष्टपणे दिसतं की, हा फोटो फेक आहे. त्यामुळे सगळ्यांसमोरच या महिलेचं खोटं पकडलं गेलंय. आता लोकांनी यावर प्रतिक्रिया देण्याची संधीच चालून आली. आता हे ट्विट व्हायरल झालं असून यावर तब्बल ४५ हजारपेक्षा अधिक लोकांना कमेंट केल्या आहेत.