Online Order Container Charge, Shocking: झोमॅटोकडून खाद्यपदार्थ ऑर्डर करणाऱ्या एका मुलीने ऑर्डरवर लादलेल्या 'कंटेनर चार्ज'मुळे संतापून मायक्रोब्लॉगिंग वेबसाइट ट्विटरवर तक्रार केली. तक्रार केल्यावर, तिच्या तक्रारीचे निवारण होऊ शकल नाही. पण झोमॅटो कस्टमर केअरचे तिला उत्तर मिळाले. त्यांच्या उत्तराने तसे कोणाचेच समाधान झाले नाही. खुशबू यांच्यासोबत या प्रकार घडला. त्यांनी एक खाण्याचा पदार्थ ऑर्डर केल्यानंतर, त्यांना मूळ रकमेपेक्षा जास्तीचे बिल लावण्यात आले त्यानंतर तिने हा राग ट्विटरवरून व्यक्त केला.
नक्की काय घडले?
अहमदाबाद येथील खुशबू ठक्कर यांनी पारंपरिक गुजराती डिश दुधी थेपला ऑर्डर केली, ज्याची किंमत ६० रुपये होती. एकूण तीन डिशची रक्कम 180 रुपये होती. मात्र, या आदेशावर ६० रुपये अतिरिक्त कंटेनर शुल्कही लावण्यात आले. जेव्हा मुलीने तिचे झोमॅटो फूड बिल पाहिले तेव्हा ती पूर्णपणे आश्चर्यचकित झाली. कंटेनरचे शुल्क तिच्याकडून आकारण्यात आले होते. एकूण रक्कम 249 रुपये झाली.
खुशबू ठक्कर नाराज झाल्या. जेवण कशात पॅक करावे हा हॉटेलचा प्रश्न आहे. मग त्यांनी जेवणासोबत कंटेनरचे शुल्क का जोडावे असा त्यांचा सवाल होता. त्यांनी ट्विटरवरून याबद्दल राग व्यक्त केला. "कंटेनरचे शुल्क ६० रुपये? हे तर मी मागवलेल्या खाद्यपदार्थ्यांच्या एका डिशएवढे आहे. हे योग्य आहे का? खरोखर मी पाहतेय तेच घडलंय का?" असा खोचक संदेश तिने लिहिला. झोमॅटो केअरनेही या पोस्टवर आपली प्रतिक्रिया दिली. यात झोमॅटोकडून सर्व गोष्टी दुकानदारावर ढकलला. दुकानदाराने हे शुल्क आकारले असल्याने आम्ही यात काही करू शकत नाही, असे त्यांनी लिहिले. यानंतर या ट्विटवर बरेच लोक कमेंट करताना दिसत आहे.
झोमॅटोचं उत्तर
ट्विटवर उत्तर देताना, Zomato केअरने लिहिले, “हाय खुशबू, कर सार्वत्रिक आहेत आणि खाद्याच्या प्रकारानुसार कर 5-18% पर्यंत बदलतात. आमच्या रेस्टॉरंट भागीदारांकडून पॅकेजिंग शुल्क आकारले जाते, ते या गोष्टींची अंमलबजावणी करतात आणि त्यातून कमाई करतात." ही पोस्ट पाहून अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. एका वापरकर्त्याने लिहिले की, "असो, ते जे खाद्यपदार्थ विकत आहेत ते महाग आहे आणि ही अवास्तव भाडेवाढ आहे, आपण आता विचार केला पाहिजे आणि त्यांच्याकडून ऑर्डर देणे थांबवले पाहिजे."