एखाद्या सहलीला गेल्यावर हॉटेल किंवा होम स्टेमध्ये आधी गेलेल्या लोकांचा बराच कचरा पडलेला असतो. ही फारच कॉमन बाब आहे. पण बऱ्याचदा काही लोक अशा अशा वस्तू सोडून जातात ज्यांचा कधी विचारही केला नसेल. पॅरिसमध्ये ट्रीपवर गेलेल्या महिलेसोबत असंच काहीसं घडलं. @eemeecee या ट्विटर आयडीवरून महिलेने याबाबत सगळं काही सांगितलं.
महिलेच्या या ट्विट पोस्टला आतापर्यंत 700 पेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. तिने पोस्टमध्ये लिहिलं की, मला मदत आणि रिट्विटची गरज आहे. आम्ही पॅरिसमध्ये एक आठवड्यासाठी एअरबीएनबी हॉटेलमध्ये साधारण 97 हजार रूपये पे केले होते. आज आम्ही पोहोचलो आणि रूममध्ये गेल्यावर डिल्डो आणि सेक्स टॉइज दिसले. हे फारच घाणेरडं आणि धक्कादायक आहे.
महिलेने जे फोटो शेअर केले त्यात धुळीने माखलेला एक टेबल आणि बॉक्समध्ये काही वस्तू दिसत आहेत. यात एक पर्पल कलरचं व्हायब्रेटर, ल्यूबच्या दोन बॉटल, वार्मिंग ड्यूरेक्स ल्यूबची एक बॉटल तसेच एक चार्जिंग केबल दिसत आहे.
महिलेने लिहिलं की, हे फारच चुकीचं आहे आणि हे लोक आमच्या पैशांसोबत, आमच्या वेळेसोबत खेळ करत आहेत. इथे कोळीही आहेत. आम्ही फार निराश आहोत. एका दुसऱ्या ट्विटमध्ये तिने दावा केला की, तक्रार केल्यावर फक्त सफाई करण्यात आली.
ती असंही म्हणाली की, रूममधील कपाट कपड्यांनी भरलेले होते. त्यामुळे त्यांनी सोबत आणलेले कपडे ठेवण्यासाठी त्यांना जागाच नव्हती. महिलेच्या पोस्टवर 300 कमेंट्स आल्या. लोकांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या.