जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटी 80 लाख 51,553 इतकी झाली आहे. त्यापैकी 6 लाख 89,476 रुग्णांचा मृत्यू झाला असून 1 कोटी 13 लाख 48,348 रुग्ण बरे झाले आहेत. बऱ्या होणाऱ्या रुग्णांचा आकडा अधिक असला तरी अजूनही कोरोना पुर्णपणे नष्ट झालेला नाही. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेनं ( WHO) सांगितलेल्या नियमांचं काटेकोर पालन करणं गरजेचं आहे. पण, अजूनही अनेक जणं तोंडावर मास्क न घातताच फिरताना पाहायला मिळत आहेत. अशाच एका तरुणाला महिलेनं चांगली अद्दल घडवली आहे. विनंती करूनही हा तरूण ऐकल नसल्यानं महिलेनं चक्क गरम कॉफी त्याच्या चेहथ्यावर फेकली.
अमेरिकेत सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. येथील कोरोना रुग्णांची संख्या ही 47 लाख 64,588 इतकी झाली आहे. येथील मृतांचा आकडाही सर्वाधिक आहे. येथे 1 लाख 57,905 जणांचा मृत्यू झाला असून 23 लाख 63,165 रुग्ण बरे झाले आहेत. मृतांची संख्या अधिक असूनही अजूनही येथील काही नागरिक मास्क न घालताच घराबाहेर पडत आहेत. कॅलिफोर्नियातील मॅनहॅटन बिच येथे हा प्रसंग घडला.
एक व्यक्ती मास्क न घालता, एका कपल जवळ येऊन बसला. मास्क न घालण्याच्या त्याच्या भूमिकेचं तो जोरदार समर्थन करत होता. पण, थोड्याच वेळात त्या महिलेला राग अनावर झाला अन् तिनं हातात असलेला गरम कॉ़फीचा ग्लास त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर ओतला. त्यानंतर त्या व्यक्तीनं जे केलं ते अधिक निंदनीय होतं...
पाहा व्हिडीओ...
अन्य महत्त्वाच्या बातम्या
आयर्लंडच्या 21 वर्षीय कर्टीस कॅम्फरनं पटकावलं दिग्गजांच्या पंक्तित स्थान!
मोठी बातमी; IPL बरोबर यूएईत रंगणार महिलांची ट्वेंटी-20 चॅलेंज लीग, सौरव गांगुलीनं दिले संकेत
कारगिल युद्धात भारताविरुद्ध सीमेवर लढण्यास तयार होतो; शोएब अख्तरचा दावा
हा फोटो नीट पाहा, या लहान मुलांपैकी एक आहे भारताचा महान फलंदाज!
IPL 2020 साठी महेंद्रसिंग धोनी झाला सज्ज; 'कॅप्टन कूल'चा नवा लुक व्हायरल
भाई, चर्चा तर होणारच ना!; क्रिकेटपटूनं पत्नीला दिलं महागडं गिफ्ट; पाहा फोटो