अनेकदा आपल्या आसपास घडत असलेल्या घटनांची आपल्याला कल्पना नसते. त्यामुळे अचानक आपण संकटात सापडतो. अशा प्रसंगात काही वेळा अनोळखी व्यक्ती आपल्या मदतीला धावून येतात. सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एका महिलेचा जीव थोडक्यात वाचला आहे. हा संपूर्ण थरारक प्रसंग सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये पोर्श कार दिसत आहे. पेट्रोल पंपवरील व्यक्ती कारमध्ये पेट्रोल भरता भरता काही अंतरावर जाते. तितक्यात त्याच्या मागून एक तरुण येतो. त्यानं कारमधून पाईप बाहेर काढला आणि स्वत:कडे असलेल्या लायटरनं त्याला आग लावली. थोड्याच वेळात कारनं पेट घेतला.
कारमध्ये बसलेल्या महिलेला याची कल्पना नव्हती. कारनं पेट घेताच पंपावरील कर्मचारी आग विझवण्यासाठी पुढे आले. एकानं महिलेला कारमधून बाहेर काढलं. तिला सुरक्षित अंतरावर जाण्यास सांगितलं. दुसऱ्या कर्मचाऱ्यांन आग विझवण्यास सुरुवात केली. पुढल्या काही सेकंदांमध्ये आग नियंत्रणात आली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. ट्विटरवर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.