दिल्ली मेट्रोतील एक घटनेची जोरदार चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे ज्यात महिलांमध्ये जोरदार भांडण झालेलं पाहायला मिळत आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये महिलांचा एक गट जोरदार वाद घालताना दिसत आहे.
स्त्रिया एकमेकांना धक्काबुक्की करत आहेत, एकमेकींचे केस ओढत आहेत. त्यांच्यात एवढी जोरदार हाणामारी सुरू होती की, शेजारी उभ्या असलेल्या लोकांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला पण त्या ऐकतच नव्हत्या. वादामागील कारण समजू शकलं नाही.
दिल्ली मेट्रोच्या प्रवाशांसाठी अशा अजब-गजब घटना रोजच्याच बनल्या आहेत. सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर लोकांच्या मजेदार कमेंट्स येत आहेत.
एका युजरने दिल्ली मेट्रोतील घटनांची तुलना लोकप्रिय रिएलिटी टीव्ही शो बिग बॉसशी केली आणि दिल्ली मेट्रोमध्ये जेवढा ड्रामा होतो आहे तितका बिग बॉसमध्येही होत नाही असं म्हटलं. दिल्ली मेट्रो आणि मुंबई लोकलला फाईट क्लब ट्रान्सपोर्ट मानलं पाहिजे असंही एकाने म्हटलं आहे.