प्रत्येकजण आपल्या शरीराची काळजी घेत असतो. आपला फिटनेस ठवण्यासाठी जीम जॉईन करतात. रोज सकाळी, सायंकाळी वर्कआऊट करतात, पण अनेकांना जीमचा अनुभवही वाईट तर काहींना चांगला येतो. एका तरुणीने तिला आलेला अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे.
या तरुणीने सोशल मीडियावरुन जीमचालकावर आरोप केले, ही तरुणी रोज जीममला जायची. वर्कआऊट करण्यासाठी वेळेत जायची आणि वेळेत परत यायची. एक दिवस त्या तरुणीला जीम चालकाने अडवले आणि नाराजी व्यक्त केली आणि सांगितले की, तू जिममध्ये फक्त तुझे ग्लॅमरस फोटो क्लिक करण्यासाठी येतेस, त्यामुळे तू जिममध्ये येऊ नकोस. तरुणी गेल्या अनेक दिवसापासून जीममध्ये जात होती पण अचानक तिला बंद करण्यास सांगितले.
कौतुकास्पद! विदाऊट तिकिट प्रवाशांकडून १ कोटी रुपयांपेक्षा जास्त दंड गोळा करणारी पहिली महिला टिसी
फोटोसाठी तरुणीला जिममधून बाहेर काढण्यात आले आहे पण, तिच्या सोशल मीडियावर तसे कोणतेही फोटो नाहीत. ती दररोज जास्त वर्कआऊट करत होती. ती तरुणी फिटनेसबाबत खरोखरच गंभीर आहे आणि शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी खूप मेहनत घेत होती.
जीम चालकाने या तरुणीला अचानक काढून टाकले, नंतर तरुणीने दुसरी जीम जॉईन केली. पण, तिने सोशल मीडियावर ही घटना शेअर केल्यानंतर नेटकरी त्या जिम मालकावर संतापले. नेटकऱ्यांनी जिमवर कारवाई करण्याची मागणी केली. सध्या सोशल मीडियावर तरुणीचा फोटो व्हायरल झाला आहे.