काही दिवसांपूर्वी बंडखोरांनी सिरीयावर ताबा मिळविल्याने हा देश चर्चेत आला होता. तसा सिरीया आणि युद्ध हे समीकरण काही नवे नाही. यामुळे येथील लोकांनाही युद्धाच्या सावटाखाली जगण्याची सवय झालेली आहे. अशातच सोशल मीडियावर एका रणगाड्याचा फोटो व्हायरल होत आहे. तेथील एका व्यक्तीने त्यावर भाजी विक्रीला ठेवली आहे.
सिरीयातील एका बाजारातील हे दृष्य आहे. भाजीच्या गाड्यासारखा वापर या व्यक्तीने त्या टँकचा केला आहे. त्याच्या या धाडसाला आणि कल्पकतेला सोशल मीडियावर दाद मिळत आहे.
रिक्षा, टेम्पो, सायकल, बाईक आदी गाड्यांमधून भाजी विकणारे आपण पाहिले आहेत. परंतू रणगाड्यावर भाज्या विकणारे दृष्य जगात क्वचितच कोणी पाहिले असेल. सिरीयाच्या दमिश्कमधील बाजारातील हा फोटो आहे. तेथील स्थानिक दुकानदाराने सोव्हिएत काळातील रणगाड्याला भाजीचा गाडा बनविला आहे. हा रणगाडा सिरीयाचे माजी राष्ट्रपती अल असद यांचे सैन्य वापरत होते.
असद यांच्या सैन्याच्या ताकदीचे प्रतिक असलेल्या या टँकचा वापर खुबीने या दुकानदाराने भाजी विक्री वाढविण्यासाठी व ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी केला आहे.