काही घटना अशा असतात की त्याच्याविषयी ऐकुनच आपण अचंबित होतो. काही घटना आपलं मन हेलावुन टाकतात तर काही आपल्याला अंर्तमुख करतात. एका चोरीची घटनादेखील अशीच भावूक करणारी आहे. आता तुम्ही म्हणाला चोरीच्या घटनेमध्ये काय आलंय भावूक करण्यासारख? चोरी तर गुन्हा आहे. तुमचं बरोबर आहे पण या चोराची गोष्ट ऐकल्यानंतर तुम्ही नक्कीच भावूक व्हाल.तर झालं असं की ही चोरी झाली एका पोलिसवाल्याच्या घरी. चोराला घर सापडून पोलिसवाल्याचंच घर सापडलं. छत्तीसगढमध्ये काम करणाऱ्या एका पोलिसवाल्याची घरी ही चोरी झाल्याचं मध्यप्रदेशातील कोतवाली पोलिस ठाण्याचे साहाय्यक पोलिस उप निरिक्षक यांनी सांगितले. चोरी करण्यात आलेल्या पोलिसाचे घर भिंड येथे आहे. ३० जूनला पोलिस आणि त्याचे कुटुंब नातेवाईकांच्या घरी गेले होते जे सोमवारी परत आले. घरी आल्यावर त्यांनी पाहिलं की खोलीच्या दरवाज्याचं टाळं तुटलेलं आहे आणि सामान अस्ताव्यस्त पडलंय. त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्या घरी चोरी झालेली आहे. चोरी केल्यानंतर चोराने तिथे एक माफीनामा ठेवला होता. त्यात असं लिहिलं होतं की, माफ कर मित्रा मजबूरी आहे. मी असं केलं नसतं तर माझ्या मित्राचा जीव गेला असता. पैसे मिळाल्यानंतर परत करेन. हा माफीनामा वाचून घरातलेही अवाक् झाले.दरम्यान घरातील सोन्याचांदीच्या वस्तूंची चोरी झाली होती. पोलीस आणि कुटुंबियांना तर वेगळाच शक आहे. ते म्हणतात की, ओळखीच्यांपैकीच कुणाचातरी यात हात असावा. अधिकाऱ्याने सांगितलं की या बाबतीत केस फाईल करून तपास सुरु केलेला आहे.
चोरीची ही बातमी वाचून तुम्हीही व्हाल भावूक, चोराने लिहिला माफीनामा, चोरीचं कारण की....
By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2021 1:43 PM