बॉलीवूडचा प्रसिद्ध डान्स कोरियोग्राफर आणि निर्माता रेमो डिसूझाला (Remo D’souza) मोठा धक्का बसला आहे. काहीही संबंध नसताना एका तरुणाने कोरोना संकटाचा राग त्याच्यावर काढला आहे. खुद्द रेमो डिसुझानेच त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. (Choreographer-director Remo D’souza lightened the mood for everyone on Thursday by sharing a funny video of a man calling the Remdesivir injection as ‘Remo D’souza’. )
रेमोने इन्स्टाग्रामवर एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. जो खूप व्हायरल होत आहे. यामुळे रेमोवर राग काढणारा तरुणही खूप फेमस होऊ लागला आहे. झाले असे, या व्हिडीओमध्ये एक तरुण कोरोनासाठी वापरले जाणारे इंजेक्शन आणि लाचखोरीवर बोलत होता. यावेळी त्याने रागाने रेमो डिसुझाचे नाव घेतले. खरेतर त्याला रेमडेसीवीर इंजेक्शनचे (Remdesivir injection) नाव घ्यायचे होते. पहा हा व्हिडीओ, तुम्हाला हसू आवरणार नाही....
तुम्ही या आधीही सोशल मीडियावर या तरुणाचे स्थानिक प्रसार माध्यमांना बाईट देणारे, मोदींविरोधात बोलणारे व्हिडीओ पाहिले असतील. हा तरुण 500 रुपयांची लाचखोरी आणि रेमेसीवीर इंजेक्शनवर बोलत होता. यावेळी त्याने 500 रुपये तर आपल्या देशाचे अधिकारी लाच म्हणून खातात. सिप्ला कंपनीचे जे इंजेक्शन येतेय, 'रेमो डिसुझा' येतेय, त्याची किंमत 5000 रुपये आहे, आणि तुम्ही 500 रुपयांत देत आहात, असे तो म्हणाला. ही बाब तिथे उपस्थित कोणाच्याही लक्षात आली नाही. मात्र, सोशल मीडियाने तो तरुण बोलताना चुकला हे लगेचच पकडले. हा व्हिडीओ रेमो डिसुझापर्यंत देखील पोहोचला आणि त्याला हसूही आवरले नाही.
त्याने य़ा व्हिडीओचा शेवट मिस करू नका असे कॅप्शन लिहित हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. तसेच #justforlaugh असा हॅशटॅग वापरला आहे.