शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
3
ISRO आणि SpaceX ची भागीदारी यशस्वी, इलॉन मस्क यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
5
पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प
6
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
7
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
8
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
9
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
10
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
11
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
12
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
13
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
14
निवडणूक निकालानंतर बेकायदा होर्डिंग्ज लावल्यास कारवाई करा; हायकोर्टाचे राज्य सरकार, पोलीस प्रमुखांना निर्देश
15
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
16
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
17
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
18
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
19
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
20
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार

YouTuber ने ठोकली १.७ कोटींची सुपरकार, गाडी चालवताना करत होता Live स्ट्रीम (Video)

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2024 2:21 PM

Youtuber Jack Doherty crashes supercar during livestream, video viral: २० वर्षीय कंटेन्ट क्रिएटर जॅक डोहर्टी त्याची १.७ कोटींची मॅक्लारेन सुपरकार चालवत असताना त्याचे कारवरील नियंत्रण सुटले

Youtuber Jack Doherty crashes supercar during livestream, video viral: अमेरिकेतील एक YouTuber लाइव्हस्ट्रीम करत त्याची सुपरकार चालवत असताना कार नियंत्रणाबाहेर गेली आणि थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या रेलिंगला धडकली. या अपघातात कारमधील आणखी एक तरुण गंभीर जखमी झाला, युट्युबर मात्र बचावला. YouTuber चे नाव जॅक डोहर्टी आहे. तो YouTube आणि Kickstreamer वर त्याच्या धाडसी स्टंटसाठी ओळखला जातो. फ्लोरिडातील मियामी हायवेवर मुसळधार पाऊस पडत असताना हा अपघात झाला. या अपघाताचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामुळे लोकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, २० वर्षीय कंटेंट क्रिएटर जॅक डोहर्टी त्याची १.७० कोटी रुपयांची मॅक्लारेन सुपरकार चालवताना दिसत होता. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसते की जॅक ड्रायव्हिंग करताना लाइव्ह स्ट्रीमिंग देखील करत आहे. त्यानंतर त्याचे कारवरील नियंत्रण सुटते आणि कार निसरड्या रस्त्यावरून पुढे घसपटते आणि रेलिंगला धडकते. व्हिडिओमध्ये YouTuber ओरडताना ऐकू येतो. त्यानंतर तो आणि त्याचा शूटिंग करणारा मित्र दोघेही कारमधून बाहेर आले. यूट्युबर फारशी दुखापत झाली नाही, पण मित्राला थोडी दुखापत झाली.

जॅकने McLaren सुपरकार $२,०२,८५०.१० (म्हणजे १.७० कोटींहून अधिक)ला विकत घेतली होती. व्हिडिओमध्ये, अपघात झाल्यानंतर जॅकला अपघातग्रस्त झालेली कार पाहून पश्चाताप होताना दिसला. त्याने स्वत: अपघातानंतर अनेक फुटेज शेअर केली, ज्यापैकी एकात तो खराब झालेल्या वाहनात अडकलेला असताना मदतीसाठी ओरडतानाची तणावपूर्ण क्लिपदेखील समाविष्ट आहे. रस्त्यावरून जाणारे लोक जॅककडे धावताना दिसले आणि तुटलेल्या खिडकीतून बाहेर पडण्यास मदत करत असल्याचेही दिसून आले. यूट्युबर जॅक डोहर्टीने काही व्हिडिओ हॉस्पिटलमधून शेअर केले.

या घटनेमुळे जॅकवर सोशल मीडियावर जोरदार टीका झाली. नेटिझन्सने त्याच्या निष्काळजीपणावर प्रश्न केला. विशेषत: लाखो फॉलोअर्सवर त्याचा किती प्रभाव आहे हे लक्षात घेतले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म किकने तत्काळ कारवाई करत त्याचे अकाउंट बॅन केले.

पीपल्सच्या रिपोर्टनुसार, किकच्या प्रवक्त्याने सांगितले की, आम्ही चुकीच्या गोष्टींना अजिबात समर्थन देत नाही. या घटनेने सुरक्षा आणि जबाबदारीच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. जॅकने गेल्या वर्षाच्या शेवटी महागडी मॅक्लारेनला विकत घेतले होते, ज्याबद्दल त्याने त्याच्या YouTube चॅनेलवर अभिमानाने सांगितले होते. पण आता त्याने जे केले ते योग्य नाही.

टॅग्स :YouTubeयु ट्यूबcarकारAccidentअपघातSocial Viralसोशल व्हायरल