Viral Video : एका दुर्गम समुद्रकिनाऱ्यावर पाठीवर उलटे पडलेल्या कासवाला जीवनदान देण्यात आल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर लक्षवेधी ठरतोय. भर उन्हात मदतीची आस लावून बसलेल्या कासवासाठी हा माणूस देवदूत बनून धावून आला. यूट्युबर ब्रॉडी मास नावाच्या व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्यक्तीने समुद्रकिनारी वाळूमध्ये अडकलेल्या कासवाची सुटका केली. या व्हायरल व्हिडीओने नेटकऱ्यांची मने जिंकली आहेत.
कासवाला स्वत: च्या शरीराचे रक्षण करण्यासाठी पाठीचे कवच उपयुक्त ठरते. समुद्राच्या तळाशी असलेल्या मोठ्या खडकांपासून बचाव करण्यासाठी पाठीचे कवच कासवाचे रक्षण करते. पण अनेकदा असेही होते, जर कासव त्याच्या पाठीवर उलटे झाले तर त्याला सहज सरळ होता येत नाही. असाच काहीसा प्रकार या व्हिडीओमधील कासवासोबत झाला असावा. हे कासव स्वत: ला सरळ करण्यासाठी हालचाली करताना आणखी वाळूत रुतून बसले असावे. पण अशा अवघडलेल्या अवस्थेत सापडलेल्या कासवाची सुटका या व्यक्तीने करून त्याला नवे जीवन दिले. वजनदार असलेल्या कासवाची सुटका करताना त्या व्यक्तीची धडपड व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसून येत आहे. कासवाला समुद्रात सोडल्यानंतर त्या समुद्रकिनारी असलेले इतर कासव देखील व्हिडीओच्या शेवटी दिसून येत आहेत.
या माणसाने व्हिडीओतील दिसणाऱ्या कासवाला सरळ करत समुद्रात सोडले. कासवाची मदत केल्याने या व्यक्तीवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओला नेटकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत या व्हिडीओला १.८ मिलियन लोकांनी पाहिले आहे.
येथे पाहा व्हिडीओ :