Viral Video : तेलंगणाच्या हैदराबादमधील चंचलगुडामधून एक फार अनोखा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात दिसत आहे की, झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय घोड्यावर बसून जेवण पोहोचवायला जात आहे. रस्त्याने जाणाऱ्या लोकांनी त्याला याबाबत विचारलं तर तो म्हणाला की, पेट्रोल पंपवर लांब रांग लागली होती. ज्यामुळे त्याला बाइकमध्ये पेट्रोल भरायला वेळ लागत होता. याकारणाने त्याला घोड्यावर बसून डिलिव्हरी करणं योग्य वाटलं.
घोड्यावर बसून जेव्हा तो डिलिव्हरी करण्यासाठी निघाला तेव्हा लोक त्याच्याकडे अचंबित होऊन बघत होते. काही दिवसांआधीच केंद्र सरकारने हिट अॅंड रन केसमध्ये नवे नियम लागू केले. ज्याद्वारे 7 लाख रूपयांचं दंड आणि 10 वर्षाचा तुरूंगवास होऊ शकतो. या कायद्याविरोधात गेल्या मंगळवारी ट्रांसपोर्ट असोसिएशनने देशव्यापी संप पुकारला आणि देशभरात बस आणि ट्रकचा चक्काजाम झाला. ज्यामुळे लोकांना समस्या होत आहेत.
कुठे खाद्य पदार्थांचा पुरवठा ठप्प झाला आह तर कुठे पेट्रोल-डीझल कमी पडत आहे. संपाची बातमी समोर येताच अनेक पेट्रोल पंपांवर गाड्यांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत. सरकारने आता ही घोषणा केली आहे की, हा नवा नियम आताच लागू होणार नाही. दरम्यान, झोमॅटो बॉयचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.