सोलापूर : करकंब पोलिस ठाणे हद्दीतील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार यांच्यावर दोनपेक्षा जास्त दखलपात्र गुन्हे आहेत. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्यांच्यात फरक पडत नसल्याने २७ गावांतून टॉप १० गुंडांची यादी बनवून त्यांना दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यासाठी उपविभागीय दंडाधिकारी, पंढरपूर यांच्याकडे पोलिस अधीक्षक व उपविभागीय पोलिस अधिकारी, पंढरपूर यांच्यामार्फत प्रस्ताव पाठविण्यात आले होते.
करकंब पोलिसांनी पाठविलेल्या प्रस्तावातील पेहे येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार बिभीषण उर्फ बिभ्या बाळू बंडगर व मारुती प्रल्हाद मारकड (रा. बादलकोट) यांना उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे यांनी २ वर्षांसाठी सोलापूर जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.
ही कामगिरी सोलापूर ग्रामीण पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे व अपर पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी पंढरपूर डॉ. अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनखाली, उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे यांच्या आदेशान्वये सागर कुंजीर, शेंडगे, आर.आर. जाधव, बालाजी घोळवे, अभिजित कांबळे, भोसले, दया हजारे, दीपक लेंगरे यांनी केली आहे.