ग्रामीण भागातील प्रमुख गावांतर्गत रस्ते काँक्रिटीकरण, वाड्यावस्त्यांवरील रस्ते खडीकरण व मुरमीकरण करणे, पेव्हर ब्लॉक बसविणे, भुयारी गटार दुरुस्ती करणे, सामाजिक सभागृह बांधणे, आदी विकास कामे करण्यासाठी निधीची मागणी केली होती. त्यानुसार शासनाने माढा विधानसभा मतदारसंघातील समाविष्ट पंढरपूर तालुक्यातील जळोली (१० लाख), कान्हापुरी (१० लाख), सांगवी (१० लाख), चिंचणी (१० लाख), नेमतवाडी (१० लाख), पेहे (१० लाख), टाकळी पुनर्वसन-जळोली (१० लाख), वाडीकुरोली (१० लाख), खेडभोसे (१० लाख), खरातवाडी (१० लाख), आजोती (१० लाख), नारायण चिंचोली (१० लाख), भटुंबरे (१० लाख), भटुंबरे-उजनी वसाहत (७ लाख), सुगाव खेडभोसे (१० लाख), तरटगाव (७ लाख), बादलकोट (५ लाख, उजनी वसाहत-पटवर्धन कुरोली (९ लाख), असा १ कोटी ६७ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
सदर निधीची तरतूद करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी सहकार्य केल्याचे आ. बबनराव शिंदे यांनी सांगितले.