शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
2
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
3
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
4
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
5
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
6
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
7
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
8
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
9
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
10
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
11
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
12
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
13
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
14
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
15
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
16
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
17
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
18
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
19
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
20
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा

विधानसभेसाठी ६५५० ईव्हीएम मशीन दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 12:51 IST

सोलापूर जिल्ह्यात निवडणूक पूर्वतयारी; ३५६३ मतदान केंद्रे: ३०० मशीन राखीव ठेवणार

ठळक मुद्देजिल्ह्यातील ११ विधानसभा मतदार संघातील मतदार नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आलीमतदान केंद्राचा विचार करून निवडणूक आयोगाकडे ईव्हीएम मशीनची मागणी केली होतीअकरा मतदार संघात ३५६३ मतदान केंद्रे असून, त्यासाठी ६५५० इतके ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) लागणार

सोलापूर : विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी करण्यात येत असून, अकरा मतदार संघात ३५६३ मतदान केंद्रे असून, त्यासाठी ६५५० इतके ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) लागणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली. जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदार संघातील मतदार नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने मतदान केंद्रात कुठल्याच प्रकारची वाढ झालेली नाही. मतदान केंद्राचा विचार करून निवडणूक आयोगाकडे ईव्हीएम मशीनची मागणी केली होती. त्याप्रमाणे आयोगाने तामिळनाडू येथून मशीन पुरविले आहेत. रामवाडी गोदामात मशीनची व्यवस्था केली आहे. आलेले मशीन (बॅलेट युनिट): ६५५०, मतदान केंद्रावर लागणारे मशीन: ६२५०, राखीव: ३००, बॅटरी बॅकअप (कंट्रोल युनिट): ४७१०, राखीव: २२०, व्हीव्हीपॅट: ५०९०, राखीव: २६०.

विधानसभा मतदार संघनिहाय असलेले मतदान केंद्र व लागणाºया मशीनची संख्या पुढीलप्रमाणे आहे. करमाळा: केंद्र: ३३४ (मशीन: ५९०), माढा: ३४३ (६००), बार्शी: ३२६ (५७०), मोहोळ: ३३१ (५८०), सोलापूर शहर उत्तर: २७९ (४९०), सोलापूर शहर मध्य: ३०३ (५३०), अक्कलकोट: ३५९ (६३०), सोलापूर दक्षिण : ३२३ (५७०), पंढरपूर: ३३१ (५८०), सांगोला: २९६ (५२०), माळशिरस: ३३८ (५९०). यात शहरी विभागात ११३४ व ग्रामीण भागात २४२९ इतकी मतदान केंद्रे आहेत. या मशीनची तपासणी सुरू झाली आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारण