घरातूनच योगाचे बाळकडू मिळालेल्या श्रेया तिची बहीण बालयोगी श्रुती शिंदे यांनीदेखील अनेक विक्रम आपल्या नावावर केले होते. तिच्याकडून प्रेरणा घेत श्रेयानेदेखील तिच्या पावलावर पाऊल टाकत योगाकडे आकर्षक होत हे देदीप्य यश संपादन केले आहे. योगा करण्यासाठी योग शिक्षक प्रवीण बेंडकर व बहीण श्रेया शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आठवड्यातून दोन ते तीन वेळा सराव करीत या जागतिक विश्व विक्रमाला गवसणी घातली आहे.
----
आपल्या शरीरावर होणारे परिणाम व दुष्परिणाम टाळण्यासाठी आपल्या शारीरिक क्षमतेनुसार योगा करीत होणारे आजार टाळू शकता व शरीर निरोगी व सुदृढ राहण्यासाठी दररोज योग केल्यास शरीर तेजदार व प्रसन्न राहत असून, दररोज योगा करणे शरीराला लाभदायक आहे.
-श्रेया शिंदे, बालयोगिनी
----
लहानपणीपासूनच वेगळे काही तरी करण्याचे ठरवून जागतिक विक्रम करण्यासाठी स्वप्न बघितले होते व बर्फावर योगा करीत तिने त्याचे स्वप्न पूर्ण केल्याचा आनंद होत आहे. दोन्ही मुलींकडून योगामध्ये विविध रेकॉर्ड नावावर करण्यात आल्याने आनंद होत आहे.
- विद्या शिंदे- श्रेया व श्रुती शिंदे यांची आई
---
फोटो : २० माढा
बर्फावर योग करताना बालयोगी श्रुती शिंदे.