सांगोला ते अकलूज हा रस्ता राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग झाला आहे. यापैकी सांगोला ते महूद रस्ता अतिशय खराब झाला आहे. त्यामुळे सदर खराब रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी आ.शहाजीबापू पाटील यांनी केंद्रीय रस्ते व दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. आ.पाटील यांच्या पत्राची दखल घेऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगोला-महूद रस्ता दुरुस्तीच्या कामासाठी १० कोटी २६ लाख मंजूर केले असल्याचे लेखी पत्र दिले आहे. लवकरच या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण करून रस्ता दुरुस्तीचे काम सुरू केले जाईल, असेही केंद्रीय रस्ते व दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांना लेखी पत्राद्वारे कळविले आहे. या रस्त्याच्या मंजुरीसाठी माढा लोकसभा मतदारसंघाचे खा.रणजीतसिंह नाईक-निंबाळकर यांनी विशेष प्रयत्न केल्याचे आ.शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.
महूद-सांगोला रस्त्याच्या दुरुस्तीसाठी १० कोटी २६ लाख मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2021 4:36 AM