शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
5
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
6
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
7
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
8
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
9
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
10
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
11
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
12
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
13
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
14
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
15
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
16
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
17
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
18
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
19
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
20
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत

सोलापूर जिल्ह्यातील हत्तरसंग कुडलच्या शिलालेखासाठी १० लाख मंजूर, मराठीतील पहिला शिलालेख, संवर्धनासाठी शासनाने उचलले पाऊल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 11:01 AM

दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तरसंग कुडल येथील शिलालेखाचा माहिती फलक तयार करणे व अनुषंगिक कामासाठी राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागातर्फे १० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

ठळक मुद्देआजपर्यंत मराठीतील सर्वात जुना शिलालेख कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथील श्री गोमटेश्वराच्या पायाजवळ असल्याचे मानण्यात येतो.साक्षरतेचा महान संदेश देणारा मराठी भाषेतील पहिला शिलालेख दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तरसंग कुडल येथे आहेमराठी भाषेतील पहिला शिलालेख हा आपल्या सोलापूर जिल्ह्यात सापडला, ही अभिमानास्पद : सुभाष देशमुख,

महेश कुलकर्णी सोलापूर दि १०: दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तरसंग कुडल येथील शिलालेखाचा माहिती फलक तयार करणे व अनुषंगिक कामासाठी राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागातर्फे १० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तसा शासन आदेश ६ फेब्रुवारी रोजी परिपत्रकाद्वारे काढण्यात आला आहे.साक्षरतेचा महान संदेश देणारा मराठी भाषेतील पहिला शिलालेख दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तरसंग कुडल येथे आहे. येथील संगमेश्वर मंदिराच्या सभामंडपाच्या तुळईवर इ.स. १०१८ (शके ९४०) मध्ये कोरला असल्याची नोंद आहे. सोलापुरातील इतिहास संशोधक आनंद कुंभार यांनी हा शिलालेख शोधून काढला आहे. हा शिलालेख मराठी भाषेच्या उत्पत्ती संशोधनात महत्त्वाचा ठरतो आहे. ९९७ वर्षांपूर्वी कोरण्यात आलेला हा शिलालेख मराठी भाषेतील आद्यग्रंथ श्री ज्ञानेश्वरीच्याही १८२ वर्षे जुना असल्याचे पुरावे मिळाले आहेत. आजपर्यंत मराठीतील सर्वात जुना शिलालेख कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथील श्री गोमटेश्वराच्या पायाजवळ असल्याचे मानण्यात येतो. परंतु तो इ.स. १०३९ (शके ९०५) शतकातील असून कुडलचा शिलालेख इ.स. १०१८ मधील असल्याचा उल्लेख या शिलालेखावर आहे. हा निधी मिळवून देण्यासाठी सहकार मंत्री सुभाष देशमुख आणि पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी प्रयत्न केले होते. ------------------------असा आहे शिलालेख- शिलालेखाची लांबी ९४ सेंमी तर रुंदी १६ सेंमी आहे. तुळईची शिळा घडीव असून खोदण्यापूर्वी ती घासून गुळगुळीत करून घेतल्याचे दिसते. शिलालेखावरील अक्षरांची उंची एक सेंमी आहे. यावर कोरलेला अंक नागमोडी वळणातील, त्या काळातील लिपीतील आहे. पण अशाच प्रकारचा अंक दिवेआगार येथील ताम्रपटात असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.-------------------काय लिहिले आहे- हत्तरसंग कुडल येथील या शिलालेखावर अडीच ओळी लिहिल्या आहेत. पहिली ओळ ‘स्वस्ति श्री शके ९४० कालयुक्त संवत्सरे, माघ कधनुळिकाळ छेळा’ तर दुसरी ओळ ‘पंडित गछतो आयाता मछ मि छिमळ नि १०००’ अशी संस्कृतमधील आहे. तिसºया ओळीत ‘यवाछि तो विजेया हो ऐवा’ असे स्पष्ट मराठीत कोरले आहे.-------------------मराठी भाषेतील पहिला शिलालेख हा आपल्या सोलापूर जिल्ह्यात सापडला, ही अभिमानास्पद बाब आहे. याची प्रसिद्धी देशभर झाली पाहिजे. या हेतूने शिलालेखाच्या परिसराचे सुशोभीकरण करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करून हा निधी उपलब्ध करून दिला आहे. यामुळे पर्यटनाला मोठ्या प्रमाणात वाव मिळणार असून मराठी भाषेची सेवाही होणार आहे. ही एक सुरुवात आहे. यानंतरही सोलापूरच्या मार्केटिंगसाठी जे जे करता येईल ते आपण करू.- सुभाष देशमुख, सहकार मंत्री.

टॅग्स :SolapurसोलापूरSubhash Deshmukhसुभाष देशमुख