सोलापूर : नागणसूर - बोरोटी रेल्वे विभागातंर्गत नन इंटरलॉकींग व रेल्वे ट्रॅक दुहेरीकरणाच्या ९ किमी लांबीच्या कामासाठी १० गाड्या १ ते ९ आॅक्टोबर २०१८ या कालावधीत रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय ८ गाड्यांचे मार्ग बदलण्यात आल्याची माहिती सोलापूर रेल्वे विभागाने दिली.सोलापूर विभागात येणाºया सर्वच मार्गावरील दुहेरी करणाच्या कामास रेल्वे विभागाने गती दिली आहे़ याचाच भाग म्हणून सोलापूर-वाडी विभागातंर्गत येत असलेल्या नागणसूर-बोरोटी रेल्वे स्टेशन दरम्यानच्या ९ किमी लांबीचे काम वेगाने सुरू करण्यात आले आहे़ यामुळे या मार्गावरून धावणाºया १० रेल्वे गाड्या रद्द तर अन्य ८ गाड्यांचे मार्ग बदलरेल्वे प्रशासनाने घेतला तर अन्य ८ गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.गाडी क्रमांक ११३११ सोलापूर ते हासन एक्सप्रेस यास सोलापूर ते गुलबर्गा दरम्यान ४ ते १० आॅक्टोबर २०१८ पर्यंत ही गाडी रद्द करण्यात आली आहे.-----------------या आहेत रद्द करण्यात आलेल्या गाड्यागाडी क्रमांक गाडीचे नाव५७१३० हैद्राबाद-बिजापूर५७१२९ बिजापूर-हैद्राबाद७१३०१ सोलापूर-गुटकंल७१३०६ गुटकंल - सोलापूर५७६५९ सोलापूर-फतकनुमा५७१३४ रायचूर - बिजापूर५७१३३ बिजापूर-रायचूर५७६२८ गुलबर्गा-सोलापूर५७६८५ सोलापूर-बिजापूर५७६८६ बिजापूर-सोलापूर------------या गाड्याचा बदलला मार्गगाडी क्रमांक कोठून कुठेपर्यंत बदलण्यात आलेला मार्ग१८५२० एलटीटी ते विशाखापट्टणम कुर्डूृवाडी-लातुर रोड- विकाराबाद - सिकंदराबाद१८५१९ विशाखापट्टणम ते एलटीटी सिकंदराबाद-विकाराबाद-लातूर रोड-कुर्डूृवाडी११०१९ मुंबई-भुवनेश्वर कुर्डूृवाडी-लातुर रोड- विकाराबाद - सिकंदराबाद११०२० भुवनेश्वर - मुंबई सिकंदराबाद-विकाराबाद-लातूर रोड-कुर्डूृवाडी१२७०१ मुंबई-हैद्राबाद कुर्डूृवाडी-लातुर रोड- विकाराबाद - सिकंदराबाद१२७०२ हैद्राबाद-मुंबई सिकंदराबाद-विकाराबाद-लातूर रोड-कुर्डूृवाडी१७०३१ मुंंबई-हैद्राबाद कुर्डूृवाडी-लातुर रोड- विकाराबाद - सिकंदराबाद१७०३२ हैद्राबाद-मुंबई सिकंदराबाद-विकाराबाद-लातूर रोड-कुर्डूृवाडी
रेल्वे दुहेरीकरणाच्या कामासाठी सोलापूर विभागातील १० गाड्या रद्द; ८ गाड्यांच्या मार्गात बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2018 2:19 PM
सोलापूर रेल्वे विभाग : नागणसूर-बोरोटी रेल्वे दुहेरीकरणाचे काम सुरू
ठळक मुद्दे- नागणसूर - बोरोटी दरम्यान दुहेरीकरणाच्या काम सुरू- याच मार्गावरून धावणाºया १० गाड्या अल्पावधीत कालावधीसाठी बंद- ८ गाड्यांचे मार्ग बदलण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली