१० ग्रामसेवकांच्या बदल्यांदरम्यान दोन्ही संघटनेमार्फत आपापल्या ग्रामसेवकांना सोयींनियुक्त गावे मिळावीत म्हणून नाराजीनाट्य रंगले होते. त्यातील एका संघटनेने तर बदल्यांवर बहिष्कार टाकला होता. त्यानंतर मात्र दोन दिवसांनी बीडीओ संताजी पाटील यांना आमदार बबनराव शिंदे यांना या बदल्यात हस्तक्षेप करण्यास भाग पाडून बदल्या व्यवस्थित केल्या गेल्या. तोपर्यंत दुसरी संघटना नाराज झाली. दरम्यान, बीडीओ पाटील हे तांत्रिक कारण देत रजेवर निघून गेले. ते अद्यापपर्यंत कामावर आले नाहीत. आता बदली झालेल्या त्या दहा ग्रामसेवकांना बदली आदेश केव्हा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
---
पंचायत समितीच्या तालुकाअंतर्गत बदली झालेल्या ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी संवर्गातील दहा कर्मचाऱ्यांचे बदली आदेश तयार आहेत. परंतु जिल्हास्तरीय ग्रामसेवक संवर्गातील बदली आदेश अजून, आपल्याकडे प्राप्त झाले नसल्याने तालुकास्तरीय आदेश दिलेले नाहीत. जिल्हास्तरीय ग्रामसेवकांचे बदली आदेश प्राप्त होताच येथील आदेश देण्यात येतील.
- संताजी पाटील, बीडीओ, माढा.
---