सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने खरीप हंगामासाठी पीक कर्ज वाटपाचा १०० कोटींचा टप्पा पार केला असून, सोमवारपर्यंत १०० कोटी ५५ लाख रुपये कर्जाच्या माध्यमातून शेतकºयांना वाटप केले आहेत. महिनाभरात वसुलीही ६२ कोटी इतकी झाली आहे.
दिलेल्या कर्जाची थकबाकी वाढत असल्याने तसेच मागील काही वर्षे शेतकºयांना पीक कर्ज वाटप होत नसल्याने बँक अडचणीत आली. बँकेचा एन.पी.ए. ३९ टक्क्यांच्या पुढे गेल्याने व वसुलीत सुधारणा होत नसल्याने रिझर्व्ह बँकेने जिल्हा बँक संचालक मंडळ बरखास्त केले आहे. ३० मे रोजी संचालक मंडळ बरखास्त करुन प्रशासक नियुक्त झाल्याने पीक कर्ज वाटपाचे काय होणार?, असा प्रश्न उपस्थित केला जात होता; मात्र प्रशासकाच्या कालावधीत थकबाकी भरण्यास शेतकरी पुढे येऊ लागल्याने वसुली होत असल्याचे आकडेवारीवरुन दिसते.
दीड लाखावरील कर्जाची रक्कम भरणाºयांचे दीड लाख रुपये शासन जमा करणार असल्याचे पैसे भरणाºया शेतकºयांना पुन्हा कर्ज देण्याची हमी प्रशासकाकडून दिली जात आहे. यामुळे शेतकरी कर्ज भरु लागले आहेत.
प्रशासक नियुक्तीपासून २५ जूनपर्यंत ६२ कोटींची वसुली व ५२ कोटी रुपये कर्ज वाटप केले असल्याचे बँकेतून सांगण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी कर्जमाफीसाठी दीड लाखावरील थकबाकीदारांना ३० जूनपर्यंत रक्कम भरण्याची मुदत असून या मुदतीत पैसे भरणाºयांना दीड लाखाचा फायदा होणार आहे. यामुळे शेवटच्या ५-६ दिवसात मोठ्या प्रमाणावर शेतकरी या योजनेत सहभागी होतील असे सांगण्यात आले.--------------------आता कारवाईचा बडगा- जिल्हा बँक प्रशासकांनी मागील महिनाभरात अधिकाºयांच्या बैठका घेऊन कर्ज वसुली व कर्ज वाटपाबाबत सूचना दिल्या आहेत. असे असताना काही तालुक्यातील काही शाखांची वसुली चांगली आहे. विकास सोसायट्यांचे सचिव व बँकांच्या कर्मचाºयांना गावपातळीवरील पदाधिकाºयांना सोबत घेत वसुली करण्याच्या सूचना दिल्या असताना आजही अनेक कर्मचारी बेफिकीर असल्याचे आकडेवारीवरुन दिसत आहे. या आठवड्यात शाखानिहाय वसुलीचा आढावा घेऊन अशा कर्मचाºयांवर कारवाई प्रस्तावित केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.-------------------
- - खरीप हंगामासाठी बँकेला ६७ हजार ६३१ शेतकºयांना २८४ कोटी ७९ लाख रुपये इतके उद्दिष्ट असून मागील दोन वर्षांत उद्दिष्ट पूर्ण केलेले नाही.
- - सोमवारपर्यंत सुमारे १५ हजार शेतकºयांना १०० कोटी ५५ लाख रुपये इतकी पीक कर्ज वाटप केले आहे.
- - मेअखेरला बँकेने ४८ कोटी ७२ लाख रुपये कर्ज वाटप केले होते. २५ जून रोजी कर्ज वाटपाचा १०० कोटींचा टप्पा पार केला आहे.
- - मेअखेरला बँकेची ५०८ कोटी ४२ लाख रुपये इतकी वसुली झाली होती. ती सोमवारपर्यंत ५७० कोटी २४ लाख रुपये झाली.
-------------------------शेतकºयांकडून वसूल होणारी रक्कम पुन्हा शेतकºयांनाच वाटप करावयाची आहे. ही बाब शेतकºयांना विश्वासाने सांगण्याची जबाबदारी कर्मचाºयांची आहे. याचा आढावा घेऊन हयगय करणाºयांवर कारवाईशिवाय पर्याय नाही.- अविनाश देशमुख,प्रशासक, जिल्हा बँक