जान्हवी महेंद्र पतकी ९९.८० टक्के, हर्षद विजय इंगोले ९९.८० टक्के, आर्यन प्रदीप बाबर ९९.६० टक्के यांच्यासह ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ६४ इतकी असून, १२५ विद्यार्थी विशेष गुणवत्ता प्राप्त आहेत, तर १७० विद्यार्थी प्रथम श्रेणी उत्तीर्ण आहेत झाले. सर्वप्रथम आलेल्या विद्यार्थी व पालकांचा संस्थाध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके, संस्था सचिव म. शं. घोंगडे यांच्या हस्ते सत्कार केला. यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रा. डॉ. शंकर धसाडे, महेंद्र पत्की, प्रा. भीमाशंकर पैलवान, उन्मेश आटपाडीकर, प्रशांत रायचूरे, उपप्राचार्य ग. ना घोंगडे, पर्यवेक्षक माने, केदार, बारबोले यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
सांगोला विद्यामंदिरच्या चार विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 4:17 AM