अक्कलकोट : करजगी (ता. अक्कलकोट) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात विविध ठिकाणी विविध प्रकारची १०१ झाडे लावण्यात आली. हा उपक्रम श्री बसव प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आला.
बसव प्रतिष्ठानकडून आजवर अनेक समाजोपयोगी कार्यक्रम राबविण्यात आले. नुकतेच करजगी येथे इतर गावांच्या तुलनेत झाडांची संख्या फारच कमी असल्याचे निदर्शनास आले. त्यावरून बसव प्रतिष्ठानने हा उपक्रम राबविला. चिंच, वड, सप्तपर्णी, गुलमोहर, कडुलिंब, आदी प्रकारची झाडे लावण्यात आली.
या उपक्रमासाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मण इंडी, जितेंद्र अनंतपुरे, श्रीशैल खजुर्गी, सतीश खेड, डॉ. अमोल देशमुख, शिवलिंगप्पा नारोणे, मलेशी माळी, रमेश कलशेट्टी, शब्बीर पटेल, महांतेश गजा, चिदानंद गंदगे, सुभाष येळमेली, इरप्पा रायकोटी, आरोग्य सेविका कांबळे, भागीरथी कुंभार, बसम्मा बागलकोटी, सुनंदा बीजर्गी, कर्मचारी घंटे, मुतवल्ली, आदी उपस्थित होते.
----
०५अक्कलकोट-करजगी
करजगी येथे बसव प्रतिष्ठानकडून १०१ झाडे लावण्यात आली. यावेळी पदाधिकारी, आरोग्य कर्मचारी दिसत आहेत.
----