शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
2
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
4
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
5
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
6
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
7
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
8
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
9
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
10
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
11
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
12
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
13
राहुल गांधींचे महाराष्ट्रातील ‘गॅरंटी कार्ड’ही फ्लॉप होणार : देवेंद्र फडणवीस 
14
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
15
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
16
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
17
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत
18
इस्रायली महिला फायटर्सचे इराणवर हल्ले!
19
११ वर्षीय पीडितेच्या गर्भपातास परवानगी; रक्त नमुना, टिश्यू जतन करण्याचे निर्देश 
20
‘राज’ की बात, भाजप अन् शिंदेंची अडचण!

१०८ रुग्णवाहिका ठरली देवदूत, १६ लाख ९२ हजार रुग्णांना मिळाले जीवदान

By admin | Published: June 22, 2017 7:53 PM

-

 

आॅनलाइन लोकमत सोलापूर

सोलापूर : आप्पासाहेब पाटील

गंभीर स्थितीतील रुग्णाला घटनास्थळपासून तत्काळ रुग्णालयात पोहोचविण्यासाठी केंद्र शासनाने १०८ रुग्णवाहिका सेवा सुरू केली आहे. या रुग्णवाहिकेने मागील चार वर्षात १५ लाख ९२ हजार २०५ जणांचे प्राण वाचविले आहेत़ राज्यात ९३७ रुग्णवाहिकेद्वारे अपघात व इतर रुग्णांना सेवा देण्याचे कार्य अविरत सुरूच आहे. त्यामुळे ग्रामीण भागात या सेवेला देवदूत संबोधले जात आहे़ वाढलेल्या वाहनांमुळे अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. अपघात झाल्यापासून एक तासाच्या अगोदर संबंधित रुग्णाला उपचार मिळाल्यास सदर रुग्ण बचावण्याची शक्यता राहते. विशेषत: ग्रामीण भागात रुग्णाला वेळेवर रुग्णालयात पोहोचविण्यासाठी चारचाकी वाहन उपलब्ध होणे कठीण असते. त्याचबरोबर गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी वेळेवर रुग्णालयात दाखल करणे अत्यंत गरजेचे आहे. या अडचणीच्या परिस्थितीत रुग्णाला रुग्णसेवा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने राज्य शासनाने २६ जानेवारी २०१४ रोजी १०८ ही मोफत रुग्णवाहिका सुरू केली़ २०१४ साली ५६ रुग्णवाहिकेद्वारे १७८ अत्यावश्यक रुग्णांसह ३० हजार ७०५ रुग्णांना, २०१५ साली ७२ रुग्णवाहिकेच्या माध्यमातून २६१ अत्यावश्यक रुग्ण व २५ हजार ५३१ रुग्णांना तर २०१६ मध्ये ७१ रुग्णवाहिकेद्वारे ४९ हजार ३२१ रुग्णांना सेवा दिली़

-----------------------

आषाढी यात्रेत वारकऱ्यांच्या सेवा करणार

पंढरपूरच्या आषाढी यात्रेत १०८ या रूग्णवाहिकेव्दारे ७५ मेडीकल व १० ट्रामा गाड्यांचा ताफा ठेवण्यात आला आहे़ पालखी मार्गावरील सर्व रूग्णालयांना रूग्णवाहिका पुरविण्यात आल्या आहेत़ वारकऱ्यांना छातीत दुखणे, आॅपरेशनस, दंश, दुखापत आदी बाबींसाठी औषधोपचारही सज्ज ठेवण्यात आली आहेत़ ही सेवा २४ तास सज्ज ठेवण्यात आली आहे़ यासाठी पुण्याहुन ५४, साताराहुन ६ तर सोलापूरहुन १६ रूग्णवाहिका पालखी मार्गावर असणार आहेत़

---------------

जिल्हानिहाय रूग्णसंख्येवर एक नजर अहमदनगर ६७१३७, अकोला २७८३०, अमरावती ४९००४, औरंगाबाद ६६९१७, बीड ३८८९६, भंडारा २१०३२, बुलढाणा २१०३२, चंद्रपूर ४४७३१, धुळे ३०११८, गडचिरोली १५९२५, गोंदिया २२६८६, हिंगोली ३२२६७, जळगांव ४९२३०, जालना ३०१८१, कोल्हापूर ६०९२५, लातूर ४१५८०, मुंबई ९४१८१, नागपूर ६२८५६, नांदेड ४९९६६, नंदूरबार २२२६७, नाशिक ८१९०६, उस्मानाबाद ३०५३३, पालघर ३१९५६, परभणी २७१५९, पुणे १४०४५६, रायगड २२९५०, रत्नागिरी २३६५०, सांगली ४३४४५, सातारा ६८०९५, सिंधुदुर्ग १४३५१, सोलापूर १०४४९८, ठाणे ५६६५४, वर्धा १९२०२, वाशिम २३७८९, यवतमाळ ४६३८८़