शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
5
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
6
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
7
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
8
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
9
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
10
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
11
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
13
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
14
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
16
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
18
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
19
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
20
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल

सोलापूर शहरातील १०८ कि.मी.पाईपलाईन बदलणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 10:49 AM

दररोज पाणीपुरवठ्याचा प्रयोग : ‘स्मार्ट सिटी’ अंतर्गत गावठाणातील ड्रेनेजही बदलणार

ठळक मुद्देशहरात मोठ्या प्रमाणात खोदाई खोदाईमुळे रस्ते बंद ठेवावे लागतीलवाहतूक मार्गात बदल करावा लागेल

सोलापूर : सोलापूूर सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कंपनीतर्फे स्मार्ट सिटी एरियात (जुने गावठाण)  दररोज पाणीपुरवठा करण्यासाठी १0८ किलोमीटरची जलवाहिनी बदलण्याचे नियोजन करण्यात आले आहे.  

सोलापूर सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कंपनीचे चेअरमन असिम गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत शहरातील जलवाहिन्या व ड्रेनेजलाईन बदलण्यासाठी १७२ कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. या मंजुरीनंतर या कामाचे टेंडर काढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रक्रियेसाठी महिनाभराचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

जर या निविदेला चांगला प्रतिसाद मिळाला तर लवकरच हे काम मार्गी लागणार आहे. स्मार्ट सिटी योजनेतील शहराला दररोजचा पाणीपुरवठा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. हा प्रकल्प कशापद्धतीने राबवायचा यासाठी गेले सहा महिने अभ्यास सुरू होता. यासाठी स्मार्ट सिटी कंपनी व महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व्यस्त होते. कचºयाची समस्या मार्गी लावल्यानंतर पाणीपुरवठ्याकडे लक्ष देण्यात आले. अमृत योजनेतून वितरणची कामे पूर्ण करण्यात आली. आता स्मार्ट सिटीतून अंतर्गत जलवाहिनीची कामे झाल्यावर सोलापूरच्या पाणीपुरवठ्यात मोठी सुधारणा होणार असल्याचा विश्वास आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी व्यक्त केला आहे. 

अभ्यासासाठी ५९ लाख खर्च- स्मार्ट सिटी एरियात दररोज पाणीपुरवठा कसा करता येईल याचा प्रयोग करण्यासाठी ५९ लाख खर्च करण्यात आले आहेत. यात शहरातील दोन झोन निवडण्यात आले. या झोनमधील जलवाहिन्याचा नकाशा तयार करून मुख्य जलवाहिनीशी त्या जोडण्यात आल्या. यासाठी ३२ लाखांचे टेंडर काढण्यात आले होते. त्यानंतर या भागात नेमके किती पाणी लागेल यासाठी २४ ठिकाणी फ्लो मीटरद्वारे दररोज तीनवेळा तपासणी करण्यात आली. यासाठी २५ लाखांचे टेंडर काढण्यात आले होते. 

चाचणी झाली यशस्वी- पहिल्या टप्प्यात दयानंद कॉलेज टाकी व अवंतीनगर जलवाहिनीवरून थेट पाणीपुरवठा करून चाचणी घेण्यात आली. ८ आॅगस्टपासून आजअखेर या भागात दररोज एकास व्यवस्थितरित्या पाणीपुरवठा करण्यात येत आहे. विजेच्या समस्येमुळे दररोज पाणीपुरवठा करण्याची वेळ अद्याप निश्चित झालेली नाही. दयानंद टाकीवरून १७ हजार व अवंतीलाईनवरून १२ हजार नागरिकांना दररोज पाण्याचा लाभ मिळत आहे. यासाठी दीड लाख लिटर पाण्याची गरज भासत आहे.

ड्रेनेजलाईनही बदलणार- जलवाहिनीबरोबर याच भागातील ड्रेनेजलाईन बदलाचा प्रस्ताव आहे. या भागातील जुन्या लाईन खराब झाल्या आहेत. याशिवाय आता अपार्टमेंट सिस्टिममध्ये कमी जागेत जास्त लोकसंख्या असल्याने उत्सर्जीत पाण्याचा फ्लो मोठा असल्याने जास्त जाडीच्या ड्रेनेजलाईन घालण्यात येणार आहेत. पाण्याची पाईपलाईन व ड्रेनेजलाईन बदलणे ही दोन्ही कामे एकाचवेळी सुरू होतील. साधारण दिवाळीनंतर नोव्हेंबरमध्ये या कामांचा मुहूर्त लागण्याची शक्यता आहे. 

हे पाईप बदलणार...- शहरातील जुन्या गावठाणातील पाईपलाईन ६५ वर्षांची असल्याने जीर्ण झाली आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीतील एबीडी एरियातील १0८ किलोमीटर पाईपलाईन बदलण्यात येणार आहे. ही पाईपलाईन सी.आय. (कास्ट आयर्न) ची आहे. आता त्या ठिकाणी डी. आय. (डेक्नाईल आयर्न) पाईप घालण्यात येणार आहे. गेल्या सात वर्षांत या भागात ३८0 एम. एम. च्या पाईपलाईन डी. आय. च्या घालण्यात आलेल्या आहेत. या लाईन बदलण्यात येणार नाहीत. जुन्या ३00, २00 व १५0 एम. एम. जाडीच्या पाईपलाईन बदलण्यात येणार आहेत. बदलण्यात येणाºया पाईपलाईनचा नकाशा तयार करण्यात आला आहे. 

हा होईल फायदा...गावठाणातील पाईपलाईन बदलल्यामुळे गळती कमी होऊन पाणी वाढणार आहे. नागरिकांना जास्त दाबाने पाणी मिळेल. दररोज पाणी मिळण्याची हमी. स्मार्ट सिटी योजनेत २४ तास पाणी ठेवण्याचे प्रयोजन आहे. मीटरिंग केल्यावर हाही प्रयोग दृष्टिपथात येऊ शकतो. पाईपलाईन फुटण्याची शक्यता कमी. याचबरोबर ड्रेनेजलाईन घालण्यात येणार. अत्याधुनिक तंत्र व जास्त व्यासाची लाईन टाकण्यात येणार असल्याने ड्रेनेज तुंबण्याचे प्रकार कमी होणार.

सोलापूरकरांनो, थोडा त्रास सहन करा !जुनी ड्रेनेज व पिण्याची पाईपलाईन टाकण्यासाठी शहरात मोठ्या प्रमाणात खोदाई करावी लागेल. खोदाईमुळे रस्ते बंद ठेवावे लागतील. त्यामुळे वाहतूक मार्गात बदल करावा लागेल. ज्या भागात खोदाई सुरू असेल त्या भागातील नागरिकांना थोडा त्रास होईल. पण दोन्ही कामे एकाचवेळी करण्यात येणार असल्याने कमी वेळात काम पूर्ण करणारी यंत्रणा वापरणार. दीड वर्षात काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न राहणार. काम झाल्यावर रस्ते पूर्ववत करण्याची तरतूद.  

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाWaterपाणीwater transportजलवाहतूक