तालुक्यात चार मध्यम प्रकल्प व पंधरा लघु प्रकल्पाबरोबरच २३० पाझर तलाव,११८ के.टी.वेअर,सहा गावतलाव व जवळपास ६०० सिमेंट बंधारे आहेत. यांची तब्बल सात टीएमसी एवढी पाणी साठवण क्षमता आहे. या प्रकल्पावर २४ हजार हेक्टर बागायती क्षेत्र अवलंबून आहे.
जिल्ह्यात बार्शी तालुक्यात सर्वाधिक पंधरा लघु तर चार मध्यम प्रकल्प आहेत. या प्रकल्पावर तालुक्यातील अनेक गावांच्या पाणीपुरवठ्याच्या योजना व बागायती शेती अवलंबून आहे. दोन वर्षे चांगला पाऊस पडल्याने हे सर्व प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले होते. यंदाच्या उन्हाळ्यातही या प्रकल्पात बऱ्यापैकी पाणी होते. पाऊस ही दमदार पडल्याने या प्रकल्पातील पाणीसाठा वाढून हे सर्व प्रकल्प १०० टक्के भरले आहेत.
-----
अकरा लघु प्रकल्प १०० टक्के भरले
हिंगणी -१६०७- ८८ टक्के, जवळगाव- १२३३१०- १०० टक्के, ढाळेपिंपळगाव- ४१७१८-१०० टक्के, बाभूळगाव २२६ (बृहत लघु) १०० टक्के तर लघु प्रकल्पामध्ये पाथरी- ४१९़ ४७ -८२ टक्के, कोरेगाव -८५५- १०० टक्के, चारे- ५३४- १०० टक्के, वालवड- ४२४-१०० टक्के, काटेगाव- ४१९-१०० टक्के, कळंबवाडी- ९५१३- १०० टक्के, ममदापूर- ८९२५-१०० टक्के, गोरमाळे- ६१६०- १०० टक्के, कारी- ६०१०- १०० टक्के , तावडी- ४४८- १००, वैराग- ५१४०- १००,शेळगाव आर १०० टक्के या प्रमाणे पाणीसाठा जमा झाला आहे. पाथरी वगळता सर्व ११ लघु पाटबंधारे प्रकल्प १०० टक्के भरले आहेत.
----
बंधारे अन् पाझर तलावही तुडुंब
तालुक्यात लघु पाटबंधारे, कृषी विभाग, व जलसंधारण विभाग यांचे पाझर तलाव व सिमेंट बंधारे व कोल्हापूर पध्दतीचे बंधारे आहेत. लघु पाटबंधारे यांचे ११३ पाझर तलाव व कोल्हापूर पध्दतीचे ११० बंधारे आहेत. त्यातील ६५ बंधाऱ्याला पडदी टाकून सिमेंट बंधाऱ्यात रुपांतरित केले आहे़ तर २८३ सिमेंट बंधारे आहेत. हे सर्व बंधारे भरले आहेत तर तलावात १०० टक्के पाणी जमा झाले आहे. जलसंधारण विभागाचे ११७ पाझर तलाव आहेत. त्यातही १०० टक्के पाणी जमा झाले आहे.
-----