यावेळी आमदार राजेंद्र राऊत ,पंचायत समितीचे सभापती अनिल डिसले, संचालक रावसाहेब मनगिरे, उपसभापती झुंबर जाधव, सचिव तुकाराम जगदाळे यांच्यासह संचालक उपस्थित होते.
रणवीर राऊत म्हणाले की, बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारातील शेतकऱ्यांचा शेतमाल वाळविण्यासाठी शेड उभा करणे, तर उपबाजार वैराग येथे रस्ते डांबरीकरण, गटार बांधणे, पिण्याच्या पाणी टाकणे, वृक्षारोपण करणे, नवीन वजन काटा बसविणे यांसह बार्शी लातूररोड येथील बाजार समिती जागेत रस्ते डांबरीकरण मजबुतीकरण गटारी बांधणे अशा २३ विषयांना ११ कोटी ९८ लाख ४८ हजार ७२६ रुपयांच्या नियोजित विकास कामांना सभेमध्ये एकमताने मंजुरी मिळाली
रावसाहेब मनगिरे यांनी बाजार समितीच्या कोट्यवधी रुपयाची विकासकामे आहेत त्यामध्ये आपण सत्ताधारी विरोधक असा मतभेद न करता सर्वांना विश्वासात घेऊन काम करत असल्याचे सांगितले.
----