अक्कलकोट तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामीण रस्ते खराब असल्याची तक्रार नागरिकांकडून येत होत्या. कल्याणशेट्टी या निवडून येताच संबंधित विभागामार्फत खराब रस्त्याचे वर्गीकरण करून प्राधान्यक्रम देऊन टप्प्याटप्प्याने मार्गी लावत आहेत. या वेगवेगळ्या रस्त्यासाठी केंद्र व राज्य स्तरावर सतत पाठपुरावा करीत आहेत. या मंजूर निधीतून धोत्री ते हन्नूर, चुंगी, किणी मार्गे काझीकणबस हा प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक ४३ ची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. यामुळे या भागातील नागरिकांना सोलापूर येथे कमी अंतराच्या प्रवासाने जाणे सोयीचे होईल.
नितीन गडकरी यांच्या माध्यमातून तालुक्यातील सर्वच भागातील वेगवेगळ्या रस्त्यांना मोठ्या प्रमाणावर निधी मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
कोट
अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील रस्ते बांधणीसाठी मोठ्या प्रमाणावर निधी मिळत आहेत. यामुळे अल्प काळात तालुक्याचा चारही बाजूने प्रवास करणे सोयीचे होणार आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना दळणवळणाची चांगली सुविधा मिळणार आहेत. तीर्थक्षेत्राचा विकास होण्यास मदत होणार आहे.
- सचिन कल्याणशेट्टी,
आमदार