यंदा NSP 2.0 पोर्टलवर नवीन व नूतनीकरण विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्याची सुरुवात १८ऑगस्टपासून झाली आहे. नवीन व नूतनीकरण विद्यार्थ्याने शाळेमार्फत अर्ज ऑनलाइन सादर करण्याची अंतिम तारीख १५ नोव्हेंबर २०२१ ही आहे. शाळा स्तरावर अर्ज पडताळणीची अंतिम तारीख १५ डिसेंबर २०२१ असून, जिल्हा स्तरावर अर्ज पडताळणीची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२१ आहे.
अर्जदार विद्यार्थी हा मागील वर्षी ५० टक्क्यांपेक्षा जास्त गुणाने उतीर्ण झालेला असावा. पालकाचे वार्षिक उत्पन्न रुपये एक लाखांपेक्षा कमी असावे. एका कुटुंबातील दोनपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही. अशा पद्धतीने या योजनेतील ठळक अटी-शर्ती आहेत. नवीन व नूतनीकरणाचे अर्ज National Scholarship Portal (NSP 2.0 (www.scholarships.gov.in) या संकेतस्थळावर भरण्याची जबाबदारी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांची राहील. अधिक माहितीसाठी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
---
कोणाला याचा लाभ मिळेल
धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी पंतप्रधान यांनी घोषित केलेल्या १५ कलमी कार्यक्रमानुसार मुस्लीम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, पारसी व जैन या धार्मिक अल्पसंख्याक समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या इयत्ता १ली ते १०वीच्या वर्गातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी १२ वर्षांपूर्वी शासन निर्णयान्वये राज्यातही प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना सुरू झाली आहे.
----
040921\20210904_122608.jpg
राजेश क्षीरसागर फोटो