अपघातांचे प्रमाण कमी झाले असले तरी महिलांचा छळ, शासकीय आदेशाचा भंग, वाळू चोरी, जमिनींचे वाद अशा प्रकारच्या गुन्ह्यात वाढ झाल्याचे दाखल गुन्ह्यांच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.
सध्या कोरोना महामारीमुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच दुकाने, व्यवहार ठप्प आहेत. या काळात मात्र सोलापूर शहर व जिल्ह्यात गुन्हेगारीत मोठी वाढ झाली आहे. वाळूसह, चोऱ्या, किरकोळ भांडणे, शेतीच्या तक्रारी, अवैध दारू विक्री, जुगार, महिलांचा छळ या घटना वाढल्या आहेत.
अपघाताच्या प्रमाणात घट झाली असली तरी फसवणूक, अवैध दारू विक्री, जुगार, वाळू चोरी, शासकीय कामात अडथळा, जिल्हाबंदी आदेशाचे उल्लंघन, दुचाकी चोरीच्या घटनाही वाढल्या आहेत. कोरोना विरोधातील बंदोबस्तात व्यस्त असलेल्या पोलिसांची वाढत्या गुन्हेगारीमुळे डोकेदुखी वाढल्याने कामाचा आणखी ताण वाढला आहे.