तालुक्यातील खामगाव ते यळंब रस्त्यावरील नीलकंठा नदीवर नवीन पूल बांधण्यासाठी २ कोटी ५० लाख, वैराग ते धामणगाव रस्त्यावरील नागझरी नदीवर नवीन पूल बांधण्यासाठी ३ कोटी ८० लाख, घाणेगाव ते साकत रस्त्यावरील नीलकंठा नदीवर नवीन पूल बांधण्यासाठी २ कोटी ५० लाख, घाणेगाव ते साकत रस्त्यावरील भोगावती नदीवर नवीन पूल बांधण्यासाठी २ कोटी ५० लाख, कापसी ते सावरगाव या रस्त्यावरील खडकी नाला येथे नवीन पूल बांधण्यासाठी २ कोटी १० लाख रुपये याप्रमाणे निधी मिळवण्यासाठी पाठपुरावा केला. शासनाच्या ग्रामविकास विभागातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या ए. डी. बी. टप्पा २ अंतर्गत तालुक्यातील वरील कामांना प्रशासकीय मान्यता मिळून १३ कोटी २७ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
धोकादायक पुलाच्या दुरुस्तीसाठी १३ कोटींचा निधी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 4:43 AM