१०७ कलमाप्रमाणे एकूण २७६ जणांवर कारवाई करण्यात आलेली आहे. कलम ११० प्रमाणे एकूण २३ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये तहसील कार्यालयाकडून ३ बाॅण्ड आणि स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर यांच्याकडील १३ बाॅण्ड असे एकूण १६ बाॅण्ड घेतलेले आहेत. कलम १४४ प्रमाणे एकूण ९५ जणांवर मतदानाचे दिवशी तडीपार करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात येऊन तडीपारीच्या ९५ नोटिसा काढण्यात आल्या आहेत. कलम १४९ प्रमाणे करमाळा पोलीस ठाण्यास यापूर्वी विविध कारणांवरून दाखल गुन्ह्यातील एकूण २५७ जणांना नोटीस बजावली आहे.
ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने करमाळा तालुक्यातील एकूण ५१ ग्रामपंचायतींपैकी सालसे आणि जेऊरवाडी या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित ४९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका व पोटनिवडणुकीसह एकूण ५६ गावांमध्ये १५९ बूथ आणि ६७ इमारतीत मतदान पार पडणार आहे, तर शपथ घेणे किंवा दादागिरी, गुंडगिरी करणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही दिला आहे.
असा आहे पोलीस बंदोबस्त
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी एक उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यासह दोन पोलीस निरीक्षक, पाच सहायक पोलीस निरीक्षक, तीन फौजदार व १२५ पोलीस अंमलदार, एक राज्य राखीव दलाची २५ कर्मचाऱ्यांची तुकडी व ९६ होमगार्ड असा बंदोबस्त नेमलेला आहे. तसेच निवडणूक अनुषंगाने मतदान प्रक्रिया व मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडावी याकरिता पोलिसांकडून विविध कलमांतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
- ४९ ग्रा.पं.मधील ३५१ सदस्यांसाठी १३८८ उमेदवार निवडणूक रिंगणात असून, मतदानासाठी २१० केंद्राध्यक्ष ६३० मतदान अधिकारी, २१० सेवकांची नेमणूक केली आहे. सर्व कर्मचाऱ्यांना नेमलेल्या ठिकाणी पोहोचविण्यात आले आहे अशी माहीती तहसिलदार समीर माने यांनी दिली.
----