याबाबत, अनगर परिसरामध्ये सीना नदीच्या पात्रात बेकायदेशीररीत्या, विनापरवाना ट्रॅक्टरने वाळू नेत असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांना मिळाली. त्यानुसार पोलीस हवालदार चंद्रकांत कदम, पोलीस नाईक शरद डावरे यांच्या पथकाने धाड टाकली. यात अनगर ते नरखेड रस्त्याला असणाऱ्या बंधाऱ्याच्या परिसरात बेकायदेशीररीत्या वाळू भरलेले दोन ट्रॅक्टर निदर्शनास आले.
यामध्ये दोन ब्रास वाळूची किंमत १४ हजार रुपये व दोन ट्रॅक्टर त्याची किंमत बारा लाख रुपये असा १२ लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत दिनकर ज्ञानोबा थिटे व वैभव जगन्नाथ गुंड (दोघेही रा. अनगर, ता. मोहोळ) या दोघांवर गुन्हा नोंदला आहे. पोलीस हरिदास थोरात यांनी फिर्याद दिली असून, तपास पोलीस हवालदार सचिन मुसळे करीत आहेत.
---