२०१५ मध्ये झालेल्या उत्तर सोलापूर तालुक्यातील २४ गावांपैकी १८ गावांतील निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेल्या व निवडून आलेल्या १४६ व्यक्तींनी निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर ३० दिवसांत खर्च सादर करणे बंधनकारक होते. मात्र, खर्च सादर न केल्याने या व्यक्तींना पुढील पाच वर्षांसाठी निवडणुकीसाठी अपात्र ठरविण्यात आले आहे.
निवडणुका होत असलेल्या २४ पैकी १८ गावांतील व्यक्तींची माहिती मिळाली असून, उर्वरित गावांची माहिती घेत असल्याचे तहसीलदार जयवंत पाटील यांनी सांगितले. मात्र, २०१७ मध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयाविरोधात या व्यक्तींपैकी कोणी विभागीय आयुक्त किंवा न्यायालयात अपील केले का? याची माहिती घेत असल्याचेही तहसीलदारांनी सांगितले.
गावनिहाय सदस्य संख्या
नान्नज येथील १८, बाणेगाव १७, वडाळा १४, कोंडी ११, कळमण, तिऱ्हे, बेलाटी प्रत्येकी १०, गुळवंची ८, राळेरास ७, पडसाळी, हिरज व खेड प्रत्येकी ६, भोगाव व साखरेवाडी प्रत्येकी ५, तळेहिप्परगा व भागाईवाडी प्रत्येकी ४, याप्रमाणे १४६ व्यक्तींनी खर्च सादर केला नव्हता.