महावितरणच्या कुर्डूवाडी उपविभागीय कार्यालया अंतर्गत फेब्रुवारी महिन्यात २ कोटी ५ लाख रुपये थकीत वीज बिल वसुली झाली होती. तर १ मार्च ते १९ मार्च पर्यंत १९ दिवसात सर्व प्रकारच्या वीज कनेक्शनमधून एवढी १ कोटी ९ लाख २४ हजार वीज बिल थकीत रक्कम वसूल झाली आहे. या वीज बिल वसुली मोहिमेत उपविभागाचे सहायक अभियंता,तथा प्रभारी उपकार्यकारी अभियंता उल्हास कानगुडे, कनिष्ठ अभियंता स्मृती ठावरे, सहायक अभियंता भाग्यश्री थोरात,मंदार राजमाने,कनिष्ठ अभियंता रमेश लोकरे,प्रशासन अधिकारी ओंकार वाळके,सहायक लेखापाल गायकवाड यांची विविध पथके परिश्रम घेत आहेत.
-
उपविभागाअंतर्गत असणाऱ्या सर्व गावातील थकीत वीज बिल वसुली विविध पथकाकडून सुरू आहे. यामध्ये सर्वांचे सहकार्य मिळत आहे. विशेष म्हणजे यात जे शेतकरी ग्राहक आपल्या पंपाची थकीत बिल भरणार आहेत. त्यातील ६६ टक्के रक्कम स्थानिक पातळीवर सध्या स्थितीतील वीज घोटाळे, यंत्रणा बळकट करण्यासाठी केली जाणार आहे. शेतकऱ्यांनी चालू थकबाकी भरुन सहकार्य करावे.
- उल्हास कानगुडे, सहायक अभियंता,उपविभाग कुर्डूवाडी)
----
अशी आहे थकित वसुली रक्कम
व्यावसायिक कनेक्शन-
ग्राहक संख्या - ६८६, एकूण थकबाकी - ५९ लाख ३९ हजार, वसुली -८ लाख ४ हजार, ऊर्वरित थकबाकी - ५८ लाख ५५ हजार
औद्योगिक कनेक्शन-
ग्राहक संख्या - १६४ ,
एकूण थकबाकी -८४ लाख ७७ हजार,
वसुली -६२ लाख ६१ हजार, ऊर्वरित थकबाकी - २२ लाख १६ हजार.
कनेक्शन-
ग्राहक संख्या - ६४०३ एकूण थकबाकी - २ कोटी ९२ लाख ५१ हजार,
वसुली - २६ लाख ७५ हजार, ऊर्वरित थकबाकी - २ कोटी ६५ लाख ६७ हजार.
कनेक्शन-
ग्राहक संख्या - १३ हजार ७३१ एकूण थकबाकी - २१८ कोटी ६९ लाख ४७ हजार,
शासनाने माफ केलेली रक्कम - ७४ कोटी २२ लाख,
वसुली - ११ लाख ८४ हजार, ऊर्वरित थकबाकी - १४४ कोटी ४७ लाख ४३ हजार
------