सांगोला : महाराष्टÑ शासन जलसंधारण विभागामार्फत ‘गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजना व पाणी फाउंडेशन वॉटर कप स्पर्धा’ सन २०१८ मध्ये सहभागी झालेल्या गावांसाठी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सोलापूर जिल्ह्यातील सहा तालुक्यातील १२३ गावांना १ कोटी ८४ लाख ५० हजार रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. त्यामध्ये सांगोला तालुक्यातील १५ गावांचा समावेश असून प्रत्येकी दीड लाख रुपयांप्रमाणे २२ लाख ५० हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती तहसीलदार संजय पाटील यांनी दिली.
८ एप्रिल ते २२ मे या दरम्यान राबविण्यात येणाºया वॉटर कप स्पर्धेमध्ये समाविष्ट झालेल्या गावांत मर्यादित कालावधीमध्ये विविध जलसंधारणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. या कामावर विविध खासगी व्यक्ती, अशासकीय संस्था किंंवा ग्रामपंचायतीकडून यंत्रसामुग्री उपलब्ध करुन दिली जाते. या यंत्रसामुग्रीसाठी लागणारा इंधन खर्च शासनाच्या जलसंधारण विभागाकडून देण्याचा निर्णय झाला आहे.
जी गावे मृदू व जलसंधारणाची कामे श्रमदानातून करतील, अशा गावांना प्रोत्साहन म्हणून यंत्राद्वारे करण्यात येणाºया कामावरील इंधन खर्चापोटी प्रतिगाव दीड लाख निधी जलयुक्त शिवार अभियान सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात उपलब्ध होणाºया निधीतून दिला आहे.
शासनाची मदत मोलाची ठरणार- सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर, मंगळवेढा, बार्शी, करमाळा, सांगोला व माढा या तालुक्यातील १२३ गावांत पाणी फाउंडेशन अंतर्गत जलसंधारणाची कामे सुरु आहेत. या गावांना प्रत्येकी दीड लाख रुपयांचा इंधन निधी मंजूर झाल्याने जलसंधारणाची चळवळ प्रभावीपणे राबविण्यास मोठी मदत होणार आहे. सध्या सांगोला तालुक्यातील १५ गावांत श्रमदानातून जलसंधारणाची कामे सुरु आहेत, परंतु यापुढील काळात स्पर्धेच्या मुदतीत यांत्रिकी सामुग्रीचा वापर करावा लागणार आहे. त्यादृष्टीने शासनाची मदत मोलाची ठरणार असल्याचे पाणी फाउंडेशनचे सांगोला तालुका समन्वयक राजू वाघमारे, किशोर झेंडेकर यांनी सांगितले.प्रत्येकी दीड लाख- सांगोला तालुक्यातील नाझरे, तरंगेवाडी, नराळे, बलवडी, चिणके, भोपसेवाडी, लक्ष्मीनगर, मेडशिंंगी, वाकीशिवणे, पारे, डिकसळ, यलमार-मंगेवाडी, हंगिरगे, अजनाळे व कमलापूर या १५ गावांना प्रत्येकी दीड लाख रुपयांप्रमाणे २२ लाख ५० हजार रुपये इंधनखर्चापोटी मदत म्हणून दिले जाणार आहेत.