शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
4
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
5
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
6
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
7
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
8
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
9
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
10
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
11
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
12
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
13
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
14
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
15
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
16
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
17
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
18
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
19
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
20
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!

महावितरणच्या अभय योजनेचा २ लाख ४० हजार वीजग्राहकांना होणार लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 3:49 PM

कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या घरगुती व कृषी ग्राहकांसाठी महावितरणने नवीन अभय योजना जाहीर केली आहे. यात ग्राहकाला थकबाकीची रक्कम पाच हप्त्यात भरण्याची सवलत राहणार आहे. तसेच थकीत रकमेवरील व्याज व विलंब आकार १०० टक्के माफ करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देथकीत रकमेवरील व्याज व विलंब आकार १०० टक्के माफ करण्यात येणार थकबाकीची रक्कम पाच हप्त्यात भरण्याची सवलतरक्कम भरल्यानंतर ग्राहकाचा वीजपुरवठा सुरू करण्यात येईल

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १४ : कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या घरगुती व कृषी ग्राहकांसाठी महावितरणने नवीन अभय योजना जाहीर केली आहे. यात ग्राहकाला थकबाकीची रक्कम पाच हप्त्यात भरण्याची सवलत राहणार आहे. तसेच थकीत रकमेवरील व्याज व विलंब आकार १०० टक्के माफ करण्यात येणार आहे. बारामती परिमंडलात २ लाख ४० हजारांहून अधिक वीजग्राहकांना या योजनेचा लाभ होणार आहे. महावितरणच्या ज्या घरगुती व कृषी ग्राहकांचा वीजपुरवठा ३१ मार्च २०१७ पूर्वी कायमस्वरूपी खंडित करण्यात आलेला आहे, अशा ग्राहकांसाठी ही नवीन योजना आहे. योजनेत सहभागी होणाºया ग्राहकांच्या मूळ थकीत रकमेची पाच हप्त्यात विभागणी करण्यात येणार आहे. त्यापैकी मूळ थकीत रकमेचा पहिला हप्ता व वीज जोडणीसाठी आवश्यक असणारी रक्कम भरल्यानंतर ग्राहकाचा वीजपुरवठा सुरू करण्यात येईल. उर्वरित मूळ थकबाकीच्या ४ हप्त्यांचा भरणा ग्राहकाने त्याला येणाºया मासिक वीज बिलासोबत करणे आवश्यक आहे. ग्राहकांनी थकीत रकमेचा पूर्ण भरणा निर्धारित पाच हप्त्यात पूर्ण केला तरच संबंधित ग्राहकाला थकीत रकमेवर व्याज व विलंब आकारात १०० टक्के माफी मिळणार आहे.बारामती परिमंडलात ३१ मार्च २०१७ पूर्वी कायमस्वरूपी खंडित करण्यात आलेल्या २ लाख ६ हजार ५९१ ग्राहकांना या योजनेत सहभागी होता येईल. त्यांच्याकडे ८५ कोटी ८६ लाखांची मूळ थकबाकी आहे. ही थकबाकी रक्कम भरल्यास त्यांच्याकडील व्याज व विलंब आकाराचे १२ कोटी ७५ लाख रुपये माफ केले जाणार आहेत. दोन्ही वर्गवारीत मिळून २ लाख ४० हजार १३० ग्राहकांकडे १६४ कोटी ९६ लाख रुपये मूळ थकबाकी तसेच व्याज व विलंब आकाराचे ६४ कोटी ८० लाख रुपये थकलेले आहेत. यातील मूळ थकबाकी भरल्यास व्याज व विलंब आकारात १०० टक्के माफी मिळणार आहे. कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेल्या कृषी व घरगुती ग्राहकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.---------------------५२ कोटी रूपये माफ केले जाणाऱ़़च्कृषी वर्गवारीतील ३१ मार्च २०१७ पूर्वी कायमस्वरूपी खंडित करण्यात आलेल्या ३३ हजार ५३९ ग्राहकांना या योजनेत सहभागी होता येईल. त्यांच्याकडे ७९ कोटी १० लाखांची मूळ थकबाकी आहे. ही थकबाकी रक्कम भरल्यास त्यांच्याकडील व्याज व विलंब आकाराचे सुमारे ५२ कोटी ५ लाख रुपये माफ केले जाणार आहेत.