सोलापूर : सोलापूर मंडलात धावणाºया प्रत्येक रेल्वे गाडीतील प्रवाशांना सुरक्षा पुरविण्याबरोबरच प्रवासादरम्यान महिलांची होणारी छेडछाड, चेन स्नॅचिंग आदी गुन्हेगारी कृत्य रोखण्यासाठी आरपीएफ पोलिसांकडून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यात येणार आहे़ वॉच टॉवर, सीसीटीव्ही कॅमेरे, बॉडी वन कॅमेरा, रिक्त जागा भरण्याबरोबरच गुन्हेगारी कमी करण्यावर भर देण्यात येणार असल्याची मािहती आरपीएफ पोलीस सुरक्षा आयुक्त जयण्णा कृपाकर यांनी दिली.
पुढे बोलताना जयण्णा कृपाकर म्हणाले की, २०१८ सालात रेल्वे अॅपवर रेल्वेतील ६ हजार १६ प्रवाशांनी तक्रार नोंदविली होती़ २ हजार ४७० अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई केली़ २०१८ सालात मुस्कान आॅपरेशनद्वारे ५७ मुलांना त्यांच्या पाल्यांच्या स्वाधीन करण्यात आरपीएफ पोलिसांना यश आले आहे़ वाडी स्टेशनवर १ लाखाचा गांजा जप्त केला आहे़ याशिवाय तिकीट दलाली करणाºया १८ जणांविरुद्ध कारवाई करून त्यांच्याकडून १ लाखांचा दंड वसूल केला आहे.
वर्षभरात ७५९ चोरीच्या घटना- सोलापूर मंडलात रेल्वेने प्रवास करणाºया ७५९ रेल्वे प्रवाशांची चोरी झाली आहे़ या चोरीच्या माध्यमातून आतापर्यंत २ कोटी ५८ लाख ७ हजार ३०० रुपयांच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यासह रोख रक्कम लंपास करण्यात चोरट्यांना यश आले आहे़ यातील ६७७ चोºया या रेल्वे प्रवासादरम्यान तर ८२ चोºया या स्थानकावर घडल्या आहेत़ आरपीएफ पोलिसांनी ८९ चोरट्यांना पकडण्यात यश मिळविले असून त्यांना अटक केली आहे़
२० सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार- वाढत्या चोºया रोखण्यासाठी सोलापूर रेल्वे स्थानकावर सिग्नल परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत़ यात २० कॅमेºयांचा समावेश आहे़ याशिवाय गुन्हेगारांच्या शोधासाठी वॉच टॉवर देखील उभारण्यात येणार आहेत़
आरपीएफ पोलिसांची कमतरता..- सोलापूर मंडलातील क्राईमचा रेषो पाहता आरपीएफ पोलिसांची संख्या कमी आहे़ सोलापूर मंडलात ३५० पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत़ सध्या आरपीएफ पोलिसांची भरती निघाली असून वरिष्ठ पातळीवर सोलापूर मंडलासाठी आणखीन १०० पोलीस देण्याची मागणी केली आहे़ आगामी काळात रेल्वे स्थानकावर रेल्वेतील सुरक्षा वाढविण्याबरोबर हेल्प डेस्क सुरू करण्यात येणार असल्याचे जयण्णा कृपाकर यांनी सांगितले़
आगामी काळात रेल्वेतील प्रत्येक प्रवाशाच्या सुरक्षेला जास्तीचे प्राधान्य देण्यात येणार आहे़ आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग वाढविण्याबरोबरच रिक्त जागा भरण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत़ आरपीएफ पोलिसांची २०१८ मधील कामगिरी उत्तम आहे़ क्राईम रेषो कमी करण्यात आरपीएफ पोलिसांनी यश मिळविले आहे़ -जयण्णा कृपाकर, विभागीय सुरक्षा आयुक्त, सोलापूर मंडल.