सोलापूर, दि. 4 - आॅटो रिक्षा, बसमध्ये सहप्रवाशाप्रमाणे शेजारी बसून प्रवाशाचे दागिने लांबविणाºया चार जणांना परिमंडळ पथकाने अटक केली. चोरट्यांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. त्यांच्याकडून ७९.५ तोळे सोने व २३ तोळे चांदी असा एकूण १९ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी आज ही माहिती दिली.अनिता बलभीम गायकवाड, रेखा लक्ष्मण गायकवाड, गणेश विलास जाधव, संजय उर्फ कालू मनोहर जाधव, अर्चना संजय जाधव, महादेवी गायकवाड अशी आरोपींची नावे आहेत. गीता सोमनाथ बळे (रा. संगम बंग, मुळेगाव रोड) या रिक्षामधून प्रवासा करत असताना तीन अनोळखी महिलांनी त्यांची बॅग चोरून नेली होती. त्या बॅगेत ३६ हजार २२० रुपयांचे दागिने होते. या प्रकरणी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात ७ जून २०१७ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी अनिता व रेखा या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. गुन्हा करताना आणखी तिघांचा समावेश असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. पोलीस आयुक्तालय परिक्षेत्रातील विविध ठिकाणांहून बसमधून प्रवास करताना लक्ष विचलित करून पर्स चोरणे, रिक्षामधून प्रवासी महिलेचे मंगळसूत्र, बोरमाळ, सोन्याची चेन चोरत असल्याची कबुली आरोपी गणेश जाधव याने पोलिसांना दिली. पोलिसांनी त्याच्या घरातून सोन्याचे दागिने जप्त केले. पोलिसांनी आरोपीकडून ७९.५ तोळे सोने व २३ तोळे चांदी असा एकुण १९ लाख ७१ हजार २७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीकडून पंधरा गुन्हे उघडकीसआरोपीकडून पाच पोलीस ठाण्यातील पंधरा गुन्हे उघडकीस आले आहेत. यात जोडभावी पेठ पोलीस ठाणे चार, सदर बझार पोलीस ठाणे दोन, विजापूर नाका पोलीस ठाणे एक, फौजदार चावडी पोलीस ठाणे सात गुन्हे, जेलरोड पोलीस ठाण्यातील एक असे एकूण पंधरा गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.यांनी केली कामगिरीपोलीस आयुक्त महादेव तांबडे, पोलीस उपआयुक्त (परिमंडळ) अपर्णा गीते यांच्या मार्गदर्शनाखाली जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे पोसइं नागेश मात्रे, पोकॉ. प्रकाश गायकवाड, सदर बझार पोलीस ठाण्याचे पोकॉ. विकी गायकवाड, जेलरोड पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार जमादार, फौजदा चावडी पोलीस ठाण्याचे मुदगल, बाबर, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोकॉ. भारत गायकवाड आदींनी ही कामगिरी केली.५० जणांना तडीपार करणार सण, उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी शहरातील ५० गुन्हेगारांना हद्दपार करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी सांगितले. जुगार व मटका चालविणाºयांविरुद्ध तडीपारीची कारवाई सुरू करण्यात आल्याचे ते म्हणाले. पोलीस उपआयुक्त परिमंडळ अपर्णा गीते यांच्या पथकाने ८० तोळे सोने व २३ तोळे चांदी जप्त करून चार आरोपींना जेरबंद केले. त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले.
२० लाखाचे सोने-चांदी जप्त : दोन महिलांसह चौघेअटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2017 11:02 PM