सोलापूर : इयत्ता दहावी परीक्षेत सोलापूर जिल्ह्यात ५२ हजार ८५४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या सर्व विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. कारण जिल्ह्यातील ३४४ कनिष्ठ महाविद्यालयांतील एकूण प्रवेश क्षमता ५५ हजार ५२० इतकी आहे.मार्च २०१३ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल ७५.२४ टक्के इतका लागला होता. यंदा मात्र यामध्ये १४.१३ टक्क्यांनी वाढ होऊन हा निकाल ८९.३७ टक्क्यांवर गेला आहे.सोलापूर शहरात अनुदानित व विनाअनुदानित कला शाखेच्या ६४ तुकड्या असून प्रवेश क्षमता ५६४० इतकी आहे. विज्ञान शाखेच्या ५० तुकड्या असून तिची प्रवेश क्षमता ४४८० आहे. वाणिज्य शाखेच्या ३६ तुकड्या असून प्रवेश क्षमता ३३२० इतकी आहे. संयुक्त शाखेच्या ५ तुकड्या असून प्रवेश क्षमता ४०० इतकी आहे.सोलापूर शहरात आॅर्किड, सोनी, सेवासदन ही कनिष्ठ महाविद्यालये स्वयं अर्थसहाय्यित असून यामध्ये कला शाखेची एक तुकडी असून तिची प्रवेश क्षमता ८० आहे. विज्ञान शाखेच्या २ तुकड्या असून तिची प्रवेश क्षमता १६० इतकी आहे. वाणिज्य शाखेच्या २ तुकड्या असून तिची प्रवेश क्षमता १६० इतकी आहे.उर्वरित जिल्ह्यातील अनुदानित व विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये कला शाखेच्या २६२ तुकड्या असून तिची प्रवेश क्षमता २२ हजार ४००, विज्ञान शाखेच्या १३२ तुकड्या असून तिची प्रवेश क्षमता ११ हजार ४४० आहे. वाणिज्य शाखेच्या २६ तुकड्या असून प्रवेश क्षमता २ हजार ५२० इतकी आहे. संयुक्त शाखेच्या २० तुकड्या असून तिची प्रवेश क्षमता १६०० इतकी आहे.जिल्ह्यात स्वयं अर्थसहाय्यित कला शाखेच्या १७ तुकड्या आहेत. तिची प्रवेश क्षमता १५६० आहे. विज्ञान शाखेच्या २० तुकड्या असून प्रवेश क्षमता १६०० आहे. वाणिज्य शाखेच्या २ तुकड्या असून प्रवेश क्षमता १६० इतकी आहे. -----------------------------अकरावी प्रवेश वेळापत्रकदहावी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी शिक्षणाधिकरी एल. एस. पोले यांनी वेळापत्रक जाहीर केले आहे. ते याप्रमाणेदि. २० ते २८ जून : कॉलेजस्तरावर प्रवेश अर्ज वाटप२४ ते २८ जून : भरलेले अर्ज संबंधित कॉलेजकडे सादर करणे२९ जून ते २ जुलै : कॉलेजस्तरावर प्रवेश अर्जांची छाननी३ जुलै : पहिली गुणवत्ता यादी ३ ते ५ जुलै : पहिल्या गुणवत्ता यादीनुसार प्रवेश८ जुलै : दुसरी गुणवत्ता यादी८ ते ९ जुलै : दुसऱ्या गुणवत्ता यादीनुसार प्रवेश१० जुलै : जागा रिक्त असल्यास तिसरी गुणवत्ता यादी१० ते १२ जुलै : तिसऱ्या गुणवत्ता यादीनुसार प्रवेश--------------------------------------प्रवेश सुकरइयत्ता दहावीच्या परीक्षेत सोलापूर जिल्ह्यातील ५२ हजार ८५४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या विद्यार्थ्यांचा प्रवेशाचा मार्ग सुकर झाला असून एकूण प्रवेश क्षमता ५५ हजार ५२० इतकी आहे. कला शाखेच्या ३४४ तुकड्या असून प्रवेश क्षमता २९ हजार ६८० आहे. विज्ञान शाखेच्या २०४ तुकड्या असून प्रवेश क्षमता १७ हजार ६८० आहे. वाणिज्य शाखेच्या ६६ तुकड्या असून प्रवेश क्षमता ६ हजार १६० इतकी आहे. संयुक्त शाखेच्या २५ तुकड्या असून प्रवेश क्षमता २ हजार इतकी आहे.-----------------------------१९ जूनला बैठकअकरावी प्रवेशाबाबत शहर व जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांतील प्राचार्यांची गुरुवार, दि. १९ जून रोजी दुपारी १२ वाजता जुनी मिल कंपाउंड येथील नागेश करजगी आॅर्किड स्कूल येथे बैठक बोलाविण्यात आली आहे. यावेळी अकरावी प्रवेशाबाबत चर्चा करण्यात येणार आहे. १२ जुलैपर्यंत अकरावी प्रवेश प्रक्रिया चालणार असून कॉॅलेजचे नियमित वर्ग १४ जुलैपासून सुरु करण्यात येणार असल्याचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी एल. एस. पोले यांनी सांगितले.
२१६० जागा अतिरिक्त; सर्व विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश
By admin | Published: June 18, 2014 1:03 AM