शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी केला पलटवार, काय दिलं उत्तर?
2
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
3
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
4
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
5
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
6
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
7
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
8
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
9
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
10
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
11
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
12
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
13
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
14
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
15
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
16
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
17
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
18
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
19
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
20
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात

सोलापूर जिल्हा बँकेच्या २३२६ शेतकºयांनी भरले १९ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2018 12:35 PM

जिल्हा बँक: एकरकमी परतफेड योजनेतून बँकेला मिळाले १०२ कोटी

ठळक मुद्देशासनाकडून थकबाकीदार १०,८२७ शेतकरी दीड लाखावरील भरलेली रक्कम व शासनाकडून जमा द्राक्षासारखे पीक नसताना चुकीच्या पद्धतीने कर्ज वाटप

सोलापूर : दीड लाखावरील रक्कम भरा व कर्जमुक्त व्हा असा संदेश शेतकºयांपर्यंत गेल्याने मागील जून महिन्यात २३२६ शेतकºयांनी कर्जापोटी १९ कोटी २४ लाख ६५ हजार ३५६ रुपये भरल्याने शासनाने ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान’ योजनेंतर्गत २५ कोटी ९१ लाख ६४ हजार ६५५ रुपये कर्ज खात्यावर जमा केले आहेत. एक रकमी परतफेड योजनेतून जिल्हा बँकेला आतापर्यंत १०२ कोटी १४ लाख ८५ हजार ८४० रुपये मिळाले असल्याचे सांगण्यात आले.

मागील वर्षी २४ जून रोजी राज्य शासनाने राज्यातील शेतकºयांचे दीड लाखापर्यंत सरसकट कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला. दीड लाखापर्यंतचे कर्ज असलेल्या सर्वच शेतकºयांचे कर्ज शासनाने भरले असून दीड लाखावरील कर्जाची रक्कम भरणाºया शेतकºयांच्या खात्यावर शासन दीड लाख रुपये जमा करीत आहे. सोलापूर जिल्हा बँकेचे दीड लाखावरील कर्जदार १७ हजार २७३ इतके शेतकरी ‘ग्रीन’ यादीत आले आहेत. यापैकी ३० जूनअखेर ६ हजार ४४६ शेतकºयांनी दीड लाखावरील ४४ कोटी ५० लाख ५९ हजार ३२२ रुपये कर्ज खात्यावर जमा केले आहेत.

शासनाने दीड लाखाप्रमाणे ७७ कोटी २७ लाख ४० हजार ३४८ रुपये जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकºयांच्या खात्यावर जमा केले असल्याचे बँकेकडून सांगण्यात आले. शेतकºयांनी  दीड लाखावरील भरलेली रक्कम व शासनाकडून जमा झालेली रक्कम अशी १०२ कोटी १४ लाख ८५ हजार ८४०  रुपये इतकी रक्कम जिल्हा बँकेला मिळाली आहे. 

एकरकमी परतफेड योजनेंतर्गत दीड लाखावरील रक्कम भरण्यास वेग आला तो जिल्हा बँकेने नव्याने कर्ज देण्याची हमी दिल्यानंतर. प्रशासक अविनाश देशमुख यांनी दीड लाखावरील रक्कम भरणाºयांना पुन्हा पीक पाहून कर्ज देण्यास सुरुवात केल्याने जून या एकाच महिन्यात २३२६ शेतकºयांनी १९ कोटी २४ लाख ६५ हजार ३५६ रुपये कर्ज खात्यावर भरले आहेत. 

शासनाकडून थकबाकीदार १०,८२७ शेतकरी - दीड लाखावरील थकबाकीदार कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या ‘ग्रीन’ यादीतील १० हजार ८२७ शेतकºयांनी अद्यापही दीड लाखावरील रक्कम भरलेली नाही. या शेतकºयांनी १६९ कोटी ९१ लाख ९६ हजार २४५ रुपये भरल्यानंतर त्यांच्या खात्यावर ९२ कोटी ६६ लाख ६७ हजार ६५० रुपये शासन जमा करणार आहे. यापैकी बहुतेक शेतकरी हे मोठे बागायतदार म्हणून कर्ज दिलेले आहेत. अनेकांना क्षेत्र कमी असताना व द्राक्षासारखे पीक नसताना चुकीच्या पद्धतीने कर्ज वाटप केले आहे.दीड लाखाप्रमाणे २५ कोटी ९१ लाख ६४ हजार ६५५ रुपये कर्ज खात्यावर जमा झाले आहेत.  

शासनाने दीड लाखावरील रक्कम भरण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत दिली आहे. शेतकºयांनी दीड लाखावरील कर्ज तत्काळ भरावे व नव्याने कर्ज घेऊन कर्जमुक्त व्हावे. पीक पाहून कर्ज दिले जाईल. - अविनाश देशमुख,प्रशासक, जिल्हा बँक

टॅग्स :SolapurसोलापूरbankबँकFarmerशेतकरी