आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ७ : राज्यात अॅट्रॉसिटीच्या केसेचे प्रमाण जवळपास ७ टक्के आहे़ वर्षभरात आतापर्यंत २३०० केसेस अॅट्रॉसिटी अॅक्ट खाली दाखल झालेल्या आहेत़ तसेच महिला अत्याचाराच्या प्रमाण २२ ते २३ टक्के एवढे आहे़ राज्यात वर्षभरात १० हजारापेक्षा जास्त केसेस महिला अत्याचार अॅक्टखाली दाखल झाल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक (मानवाधिकार)खालिद कैसर यांनी दिली़ अॅट्रॉसिटी अॅक्टखाली दाखल केसेसचे प्रमाण पाहता संबंधितांवर शिक्षा होण्याचे प्रमाण फारच कमी आहे याबाबत विचारले असता पोलीस महानिरीक्षक कैसर म्हणाले की, आता राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यास व्हिडिओ कॅमेरे पुरविण्यात आले आहेत़ प्रारंभी साक्षीदार व फिर्यादीचे व्हिडिओ रेकॉडिंग करण्याच्या सुचना दिल्या आहेत़ त्यामुळे साक्षीदार फुटण्याचे प्रमाण कमी होणार आहे़ या गुन्ह्यांचा निकाल लवकरात लवकर लागावा यासाठी जिल्हा पातळीवर विशेष न्यायालये निर्मिती लवकरच होईल असेही कैरस यांनी सांगितले़ याशिवाय तपास लवकर पूर्ण व्हावा यासाठी अधिकाºयांना प्रशिक्षण देण्याचे कामही सुरू आहे़ अॅट्रॉसिटी गुन्हयांचा तपास प्रामुख्याने उपविभागीय पोलीस अधिकारी दर्जाच्या अधिकाºयांना देण्यात येत आहे़ गुन्हे कमी व्हावे व गुन्हेगारांना तात्काळ शिक्षा व्हावी यासाठी शासन प्रयत्न करीत असल्याचेही कैसर यांनी सांगितले़ यावेळी सोलापूर पोलीस आयुक्तालयात महिला सुरक्षेबाबत विशेष पोलीस महानिरीक्षक खालिद कैसर यांनी आढावा घेण्यात आला़ यावेळी पोलीस आयुक्त महादेव तांबडे, सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक एस़ विरेश प्रभू, पोलीस उपायुक्त नामदेव चव्हाण यांच्यासह शहर व ग्रामीण पोलीस दलातील प्रमुख अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते़
राज्यात अॅट्रॉसिटीचे २३०० तर महिला अत्याचाराचे १० हजारापेक्षा जास्त केसेस दाखल, विशेष पोलीस महानिरीक्षक खालिद कैसर यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2017 3:00 PM
राज्यात अॅट्रॉसिटीच्या केसेचे प्रमाण जवळपास ७ टक्के आहे़ वर्षभरात आतापर्यंत २३०० केसेस अॅट्रॉसिटी अॅक्ट खाली दाखल झालेल्या आहेत़ तसेच महिला अत्याचाराच्या प्रमाण २२ ते २३ टक्के एवढे आहे़
ठळक मुद्देविशेष पोलीस महानिरीक्षक (मानवाधिकार)खालिद कैसर सोलापूर दौºयावरमहिला सुरक्षेबाबत घेतला शहर व जिल्ह्याचा आढावाकायदा व सुव्यवस्थेबाबत अधिकाºयांना दिल्या सुचना