सोलापूर: नाशिक जिल्ह्यातील जानोरी (ता. दिंडोरी) गावातील २४ जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. हे चोवीस भाविक सायकल रॅलीने पंढरपूरला विठ्ठल दर्शनासाठी आले होते. मात्र गावी परत गेल्यानंतर त्या सर्व २४ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. एवढेच नाही तर त्यांच्या संपर्कात आलेले गावातील व कुटुंबातील इतर चौदा जण पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती ग्रामपंचायतीने दिली. दरम्यान या भाविकांना कोरोनाची लागण प्रवासादरम्यान झाली की पंढरपूर शहरात झाली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. नाशिक जिल्ह्यातील 24 भाविक सायकल घेऊन पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेले होते दर्शन आटपून हे भाविक गावी परतल्यावर ते कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. याबाबतची माहिती जानोरी ग्रामपंचायतीने प्रसिद्धीपत्रक काढून दिली. हे सर्व भाविक गावी परतले आहेत पंढरपूरला जाऊन आलेले सगळेच्या सगळे भाविक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्या १४ जणांनादेखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे गावातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३८ वर गेली आहे.
CoronaVirus News: विठुरायाच्या दर्शनासाठी नाशिकहून सायकलवरून आलेले २४ भाविक कोरोना पॉझिटिव्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2020 3:08 PM